H3N2 Influenza Virus Cases in Chhatrapati Sambhaji Nagar : देशात दिवसेंदिवस H3N2 विषाणूचा (H3N2 Virus) संसर्ग वाढताना पाहायला मिळत असताना, आता आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे.  H3N2 विषाणूचा छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) देखील शिरकाव झाला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अलर्ट झाली असून, त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात H3N2 चे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. पण प्रत्येक फल्यू हा इन्फल्यूएंझा H3N2 नसतो. त्यामुळे घाबरुन जाऊ नयेत, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. 


आरोग्य विभागाचे आवाहन! 


H3N2 संक्षयित रुग्ण यांनी महानगरपालिकेच्या अथवा शासकीय रुग्णालयात जावून H3N2 ची स्वॅब तपासणी व औषधोपचार करुन घ्यावे, सदरील आजारावरील औषधोपचार महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रावर उपलब्ध आहेत. तर गेल्या 10 दिवसांमध्ये H3N2 बाधित रुग्णासोबत सहवास आला असेल व तुमच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचे लक्षणे आढळून आल्यास त्वरीत नजीकच्या महानगरपालिका आरोग्य केंद्रास संपर्क साधा. साथरोग 24  तास नियंत्रण कक्ष फोन क्र. 0240-2333536/40 किंवा विस्तारित क्र. 250 (जन्म मृत्यू खिडकी) ई-मेल fwsipamcabd@yahoo.co.in वर संपर्क साधावा.  H3N2 हा Notifiable आजार असल्यामुळे सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी 24  तासाच्या आत महानगरपालिकेस कळवावे असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी केले आहे.


H3N2 प्रतिबंधात्मक उपाययोजना


हा आजार  कशामुळे होतो? 



  • हा विषाणू मुळे होणारा आजार आहे. 

  • याचा संसर्ग एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो.


H3N2 लक्षणे



  • ताप, घसा दुखी, खोकला, नाक गळणे

  • श्वास घेण्यास त्रास होणे.


या करिता उपाय योजना 



  • म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.

  • वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा.

  • खोकताना व शिकताना हातरुमाल वा कपडयाने तोंड झाकुन घ्या.

  • आपले नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुवून काढा.

  • खोकला, गळणारे नाक, शिंका व ताप अशा प्रकारची इन्फल्यूएंझाची लक्षणे आढळून येणा-या बाधित

  • व्यक्तीपासून हातभराच्या अंतरावर राहा.

  • पौष्टिक आहार घ्या व भरपूर पाणी प्या.

  • नागरिकांनी धुम्रपान टाळावा.

  • लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्य दायी पदार्थाचा आहारात वापर करावा.

  • पुरेशी झोप व विश्रांती घ्या.

  • डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका.


हे करु नका



  • हस्तांदोलन करण्याचे टाळावे 

  • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

  • आपल्याला फल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका..


खालील अतिजोखमीच्या व्यक्तीमध्ये H3N2 होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो



  • पाच वर्षाखालील मुले

  • 65 वर्षावरील वरिष्ठ नागरीक.

  • गरोदर माता

  • मधुमेह स्थूलत्व

  • उच्च रक्तदाब किंवा इतर ह्दयरोग

  • चेतासंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती

  • फुप्फुस, यकृत मुत्रपिंड यांचे आजार असणा-या व्यक्ती

  • दिर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्ती, रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar: आता H3N2 विषाणूचा छत्रपती संभाजीनगर शहरात शिरकाव; ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण घराघरांत