Ambadas Danve On CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह शिंदे गट व भाजप आमदार खासदार आज अयोध्येच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येत आहे. तर प्रभू रामासाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिराचा आढावा देखील शिंदे आणि फडणवीस यांनी घेतला आहे. दरम्यान याच भाजप-शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दोन्ही पक्षावर निशाणा साधला आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी दु:खात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौरा करतायेत, असे दानवे म्हणाले. तर ठाकरे गटाच्या सर्वच लोकप्रतिनिधीकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलास देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं दानवे म्हणाले.
यावर बोलताना दानवे म्हणाले की, पश्चिम- पूर्व विदर्भासह नाशिक विभागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. मराठवाड्यात देखील अवकाळी पाऊस झाला असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागच्या महिन्याभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचे देखील अजून पंचनामे झाले नाहीत. अशात शेतकऱ्यांच्या डोक्यावर आता नवीन संकट उभं राहीले आहे. त्यामुळे अशावेळी शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना दिलास देण्यासाठी प्रयत्न करतील. परंतु असे असताना झालेल्या नुकसानीचे पंचनामे होण्याची गरज आहे. मात्र शेतकरी दु:खात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्य दौरा करतायेत. राज्यातील रयत जर सुखी नसेल तर एखाद्या विमानाने देवाच्या दर्शनासाठी कितपत योग्य आहे. कारण बांधावर असलेल्या शेतकऱ्यांमध्ये देव दडलेला, असल्याचा दानवे म्हणाले आहे.
ठाकरे गटाकडून नुकसानग्रस्त भागाचा दौरा...
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अयोध्याच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या याच दौऱ्याला आता ठाकरे गटाकडून देखील उत्तर दिले जाणार आहे. ठाकरे गटाचे नेते आता अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील नुकसानग्रस्त भागात हा दौरा असणार आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे हे देखील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप-शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्याला ठाकरे गटाकडून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून उत्तर देण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
अयोध्येत पोहचताच शिंदे गटाच्या आमदारांचा ठाकरे पिता-पुत्रांवर हल्लाबोल, पाहा कोण काय म्हणाले?