Chhatrapati Sambhaji Nagar: औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचे शासन आदेश राज्य आणि केंद्र सरकराने काढला आहे. दरम्यान याच निर्णयाला काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे नामांतराविरोधात आक्षेप आणि हरकती विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात येत आहे. सोबतच समर्थनार्थ देखील अर्ज दाखल केले जात आहे. तर औरंगाबादचं जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करू नये म्हणून आतापर्यंत 1 लाख 48 हजार 203 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी एका दिवसात 32 हजार 582 हरकती विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत. तर समर्थनार्थ केवळ 4 हजार 166 सूचना आणि 774 पोस्ट कार्ड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक जावक विभागात दाखल झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या निर्णयाविरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी 27 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील आवक-जावक विभागात नागरिकांना आपल्या हरकती दाखल करता येणार आहे. दरम्यान यासाठी सोमवारचा शेवटचा दिवस शिल्लक राहिला आहे. तर आतापर्यंत आतापर्यंत 1 लाख 48 हजार 203 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. तर समर्थनार्थ केवळ 4 हजार 166 सूचना आणि 774 पोस्ट कार्ड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक जावक विभागात दाखल झाले आहेत.
बैलगाडीतून अर्ज दाखल करणार...
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात ज्याप्रमाणे आक्षेप आणि हरकती दाखल करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नामांतराच्या समर्थनार्थ देखील सूचना विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होताना पाहायला मिळत आहे. तर हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने जिल्हाभरात मोहीम राबवून नामांतराच्या समर्थनार्थ सूचना अर्ज भरून घेण्यात येत आहे. तर सोमवारी हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने बैलगाडी भरून समर्थनार्थ भरण्यात आलेले सूचना अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हिंदू एकत्रीकरण समितीचे राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे.
सोमवारी मोठी गर्दी होण्याची शक्यता...
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात आणि समर्थनार्थ अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक-जावक विभागात मोठी गर्दी होत आहे. तर शुक्रवारी देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. दरम्यान सोमवारी शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तर यावेळी दोन्ही बाजूने अधिकाधिक अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :