Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरात धक्कादायक घटना समोर आली असून, इलेक्ट्रॉनिक वाहन (Electronic Vehicle) दुरुस्तीसाठी टाकल्यावर सर्व्हिस सेंटरकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने (Farmer) स्वतःच रिक्षा पेटवून (FIRE) दिल्याची घटना समोर आली आहे. ना दुरुस्त रिक्षा दुरुस्त न करता फक्त पैसे उकळण्यात आल्याचा आरोप देखील या शेतकऱ्यांने केला आहे. शहरातील प्रोझोन मॉलच्या बाजूला असलेल्या महेंद्रा कंपनीचं रत्नप्रभा मोटर्स सर्वेस सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. तर प्रसाद पाटील असे रिक्षा पेटवून देणाऱ्या  शेतकऱ्याचे नाव आहे. 


प्रसाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पेशाने डॉक्टर असून, सोबत शेतीही करतात. दरम्यान त्यांचा दुधाचा व्यवसाय असल्याने त्यांनी दोन वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक रिक्षा घेतली होती. मात्र नवीन रिक्षा असून, देखील त्यामध्ये वारंवार काम निघत होते. तर मागे एकदा काम निघाल्यावर सर्व्हिस सेंटरवर दोन महिने गाडी उभी होती.त्यामुळे याचा फटका त्यांच्या दुध व्यवसायावर पडत होता. अनेकदा सर्व्हिस सेंटरवर पार्ट उपलब्ध राहत नसल्याचे सर्व्हिस सेंटरकडून सांगण्यात येत होते.


अन् स्वतः पेटवून दिली रिक्षा...


दरम्यान काही दिवसांपूर्वी पाटील यांची पुन्हा गाडी खराब झाली. सर्व्हिस सेंटरवर गाडी लावून देखील वेळेवर परत मिळत नव्हती. जेव्हा गाडीमालक पाटील यांनी थोडी आक्रमक भूमिका घेत विचारणा केली तर गाडी दुरुस्त करून दिली. पण गाडी घरी आणल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी बंद पडली. गाडी दुरुस्त करण्यापूर्वी सर्व्हिस सेंटर चालकांनी ऍडव्हॉन्स म्हणून 10 हजार रुपये घेतले आणि बिल सात हजार झाले होते. त्यामुळे पैसे देऊन देखील गाडी दुरूस्त न झाल्याने प्रसाद पाटील यांनी पैसे परत मागितले. पण पैसे न देता सर्व्हिस सेंटर चालकांने पुन्हा गाडी दुरूस्तीसाठी कामगारांना पाठवले. मात्र त्यांच्याकडून देखील रिक्षाची दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे पुन्हा सर्व्हिस सेंटरवर गाडी लावली. पण तरीही गाडी दुरुस्ती होत नसल्याने आज दुपारी साडेतीन वाजता गाडी मालक यांनी सर्व्हिस सेंटरवरच आपली गाडी पेटवून दिली. त्यामुळे एकच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 


चार दिवस सांगून 22 दिवसानंतरही गाडी दुरुस्ती नाहीच...


यावेळी जेव्हा रिक्षा खराब झाली, तेव्हा चार दिवसात दुरुस्ती करून देतो असे सांगत सर्व्हिस सेंटर चालकांनी ऍडव्हॉन्स पैसे जमा करून घेतले. सहसा काम झाल्यावर झालेलं बिल देऊन गाडी ताब्यात देण्यात येते, मात्र येथे आधीच पैसे घेण्यात आले. मात्र एवढे करून देखील 22 दिवस झाल्यावर देखील गाडीची दुरूस्ती झाली नाही. जेव्हा-जेव्हा विचारणा केली, त्यावेळी फक्त उडवाउडवीची उत्तर देण्यात येत होते. गाडीचे पार्ट मिळत नाही, चुकीचे पार्ट आले त्यामुळे उशीर होत असल्याचे सांगत वेगवेगळे कारण दिले जात होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


अन् गुगलवर पाहून जी-20 परिषदेसाठी आलेल्या महिला सदस्या मस्जिदीत पोचल्या