Chhatrapati Sambhajinagar: भारताला यावर्षी जी-20 परिषदेच्या  (G-20 Conference) अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे देशातील महत्वाच्या शहरात जगभरातील विदेशी पाहुणे बैठकीसाठी येताना पाहायला मिळत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात देखील जी-20 निमित्ताने वूमन 20 ची बैठक होत आहे. मात्र त्यानिमित्त शहरात आलेल्या विदेशी महिला सदस्यांनी रविवारी (23 फेब्रुवारी) दुपारी अचानक शहरातील गारखेडामधील नुरानी मस्जिदीत (Mosque) भेट देत पाहणी केली. वेगवेगळ्या 11 देशातील महिला सदस्य 15 मिनिट याठिकाणी होत्या. गुगलवर पाहून याठिकाणी आल्याचे त्यांनी सांगितले.


याबाबत गारखेडा येथील नुरानी मस्जिद समितीने सांगितले कि, रविवारी दुपारी बारा वाजता त्यांना समजले कि, जी-20 बैठकीसाठी आलेल्या महिला सदस्य मस्जिदीला भेट देणार आहेत. त्यानंतर समितीने महत्वाचे लोक त्याठिकाणी आले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता तुर्की, इंडोनेशिया येथील 11 महिला सदस्य मस्जिदीत पोचल्या. त्यांच्यासोबत भाषांतरकार, सुरक्षारक्षक होते. मस्जिद समितीने महिला सदस्यांचे फुलांनी स्वागत केले. त्यानंतर इथे येण्याचे कारण विचारले तर, गुगलवरून मस्जिदीबाबत माहिती मिळाली. त्यामुळे शहरात आल्यानंतर इथे येण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्या म्हणाल्यात. 


मस्जिदीची घेतली माहिती 


दरम्यान गारखेडा येथे पोहचलेल्या विदेशी पाहुण्या महिलांनी मस्जिदीची कमान, डिझाईन आवडल्याचे सांगितले. तसेच 15  मिनिट याठिकाणी महिलांनी माहिती घेतली. यावेळी मस्जिद समितीचे इसर पटेल, अजीज मौलाना, मुजीब पटेल आदींची उपस्थिती होती. याची बातमी गावात पोचताच, दिवसभर गावात या घटनेचीच चर्चा होती.


'या' पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले...


जागतिक महिला परिषदेचे छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजन होत आहे.  या परिषदेसाठी विविध देशातून महिला प्रतिनिधींचे आगमन होताच त्यांचे औक्षण करण्यात आले. जिल्हा प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांनी पुष्पहार आणि शाल देऊन त्यांचे स्वागत केले. यामध्ये एंजेला जू-ह्यून कांग, डॉ.संध्या पुरेचा, बन्सुरी स्वराज, डॉ.शमिका रवी, रविना टंडन, भारती घोष,  केसेनिया शेवत्सोवा, एलेना म्याकोटनिकोवा, केल्सी हॅरिस, समंथा जेन हंग, प्रभिओत खान, आयेशा अक्तर, कार्लो सोल्डातिनी, उंडा लॉरा सब्बादिनी, जिओव्हाना आयेलिस, मार्टिना रोगाटो, , स्टेफानो डी ट्रेलिया, एल्विरा मारास्को, व्हेनेसा डी अलेस्सांद्रे, अँड्रिया ग्रोबोकोपटेल, सिल्व्हिया तारोझी, निकोलस बोरोव्स्की, कॅथरीना मिलर, हदरियानी उली तिरु इडा सी, येणें क्रिसंती, इस्तियानी सुरोनो, श्री वुर्यानिंगसिह, तंत्री किरणदेवी, हरियाणा हुताबरात, जॉइस फ्रान्सिस्का कार्ला यास्मिन, डेनाटालाइट क्रिस्डेमेरिया, डेनाटली क्रिस्डेमेरिया, फराहदिभा तेन्रीलेंबा, गुल्डन तुर्कन, यांचा समावेश आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'तुम्हारा G20, मेरा T20'; नामांतरावरुन इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा, प्रशासन अलर्ट