Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) एका आमदाराने तब्बल 2300 गायी खरेदी केल्या असून, आणखी दीड हजार गाई खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे या गाई स्वतःसाठी नाही तर मतदारसंघातील बेरोजगार तरुणांसाठी खरेदी केल्या जात आहे. गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे आमदार तथा भाजप नेते प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी हा अनोखं उपक्रम सुरु केले आहे. आपल्या मतदारसंघातील तरुणाच्या हाताला काम मिळावा म्हणून, आमदार बंब यांनी आगळीवेगळी योजना राबवली आहे. 


राज्यातच नव्हे तर देशभरात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. फक्त शहरच नव्हे तर गावागावात बेरोजगार तरुणांची फौज पाहायला मिळतेय. अशातच मराठवाड्यातील एका आमदाराने या बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. ग्रामीण भागातील तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी ही मोहीम सुरू केली आहे. आपल्या मतदारसंघातील गरजू तरुणांना त्यांनी प्रत्येकी 2 जर्सी गायी घेऊन दिल्या आहेत. त्यामुळे या दुग्ध व्यवसायातून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण महिन्याला 20 ते 21 हजार रुपयांची कमाई करतायत.


आमदार बंब यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाला गीता बन प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे. ज्यात एका शेतकऱ्याला दोन गायी देण्यात आल्या आहेत. एका गाईची किंमत 80 ते 90 हजार रुपये आहे. एक गाय दररोज 18 ते 20 लिटर दूध देते. त्यामुळे दोन गायींचे सुमारे 40 लिटर दूध मिळते. यासाठी अमूल डेअरी 27 रुपये लिटरप्रमाणे दूध विकत घेत आहे. 40 लिटरचे रोज 1480 रुपये मिळतात. ज्यात चारा, ढेप, सरकी, वैद्यकीय उपचार आदींसाठी दररोज 600 ते 700 रुपये खर्च लागतो. तो जाऊन महिन्याकाठी 20 ते 21 हजार रुपये उत्पन्न  महिन्याला होणार आहे. ज्यातील दरमहा 10 हजार रुपये बँकेत जमा करून दीड वर्षात गाय शेतकऱ्याच्या मालकीची होईल.


आणखी 1500 गायी घेतल्या जाणार 


आमदार प्रशांत बंब यांनी पहिल्या टप्प्यात पंजाबमधून 2300 गायी विकत घेतल्या आहेत. तसेच दिवाळीच्या वसुबारसपर्यंत आणखी 1500 गायी घेतल्या जाणार नाही. दूध विक्रीतून 750 तरुण स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याची माहिती बंब यांनी दिली आहे. 


गायी देताना पाच अटींचा समावेश 



  • लाभार्थी दुधाच्या व्यवसायात नसावा

  • त्याला किमान 1 एकर शेती असावी.

  • वासराला दररोज किमान 3 लिटर दूध पाजावे

  • शेतकऱ्यांच्या मुलांनाही मुबलक दूध द्यावे.

  • आणलेल्या गायींचे वय 2 ते 4 वर्षे आहे. त्या सरासरी 10 वर्षे दूध देतील. यानंतर भाकड गायी गोशाळेत पाठवणे बंधनकारक आहे. 


योजना कौतुकास्पद ठरत आहे.


एकीकडे तरुणांमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात प्रचंड रोष आहे. अशातच आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार देण्यासाठी सुरू केलेली योजना कौतुकास्पद ठरत आहे. त्यामुळे जे बंब यांनी केलं, ते इतर आमदार ही करतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sanjay Shirsat : सत्ताधारी आमदाराचा ट्रॅक्टर चोरीला, संजय शिरसाट यांची ट्रॅक्टर-ट्रॉली चोरी करणाऱ्याला पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान