Chhatrapati Sambhaji Nagar : औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) शहर आणि सिडको परिसरात असलेले अतिक्रमणविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान मंगळवारी देखील मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या नेतृत्वात अतिक्रमणविरोधात धडक मोहीम राबवण्यात आली आहे. दरम्यान यावेळी सिडकोतील बजरंग चौक परिसरातील एका हॉटेल मालकाने चक्क पार्किंगची जागा बळकावून त्यावर जिम तयार केला होता. दरम्यान महानगरपालिकेच्या पथकाने संबधित बांधकाम काढून घेण्यासाठी या हॉटेल मालकाला दोन दिवसांचा कालावधी दिला आहे. 


शहरातील अतिक्रमणावरून काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे महानगरपालिकेकडून धडक मोहीम राबवत कारवाई करण्यात येत आहे. रोज कुठल्या ना कुठल्या भागात अशी कारवाई सातत्याने सुरु आहे. दरम्यान मंगळवारी देखील अशीच कारवाई करण्यात आली. तर याचवेळी सिडकोतील बजरंग चौक परिसरातील हॉटेल सुरभीच्या मालकाने पार्किंगची जागा बळकावून त्यात जिम आणि हॉटेल थाटल्याचे पथकाला आढळून आले. त्यामुळे या हॉटेल मालकाला दोन दिवसांत जागा रिकामी करण्याची मुदत देत, इतर भागातील 10 कच्चे-पक्के बांधकाम पाडण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे संबधित हॉटेल मालकाने चक्क पार्किंगचीच जागा बळकावली होती. 


पुढील दोन दिवसांत अतिक्रमण काढून घेण्याची सूचना...


मंगळवारी सिडको भागात पुन्हा धडक मोहीम राबवण्यात आली. ज्यात टी. व्ही. सेंटर येथील संजय गांधी भाजी मार्केटमधील तीन दुकानांचे पक्के बांधकाम जेसीबीच्या मदतीने पाडण्यात आले. त्यानंतर या परिसरात पोलिस चौकीच्या मागे पार्किंगच्या जागेतील कच्चे-पक्के अतिक्रमण काढण्यात आले. या मोहिमेनंतर मनपाचे पथक बजरंग चौक परिसरातील हॉटेल सुरभी येथे दाखल झाले. सिडकोच्या नकाशानुसार देण्यात आलेल्या जागेशिवाय पार्किंगच्या 30 बाय 40  फुटांच्या जागेत अतिक्रमण करून हॉटेल व्यावसायिकाने फिटनेस जिम आणि उर्वरित जागेत हॉटेलसाठी अतिरिक्त बांधकाम केले होते. जिममध्ये किमती साहित्य असल्याने अतिक्रमण काढताना त्यास बाधा पोहचू नये, यासाठी अतिक्रमणधारकाच्या विनंतीवरून मनपा अतिरिक्त आयुक्त निकम यांनी दोन दिवसांचा अवधी त्यांना दिला आहे. 


कारवाईचा धडका सुरूच राहणार... 


औरंगाबाद खंडपीठाने नाराजी व्यक्त केल्यावर महानगरपालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाकडून सतत कारवाई सुरु आहे. शहरातील वेगेवेगळ्या भागातील अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यावर अतिक्रमण करून बसलेल्या लोकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अनेक रस्ते अतिक्रमणामुळे छोटे झाले होते. त्यामुळे अशा रस्त्यांवर असलेले अतिक्रमण देखील काढून घेण्यात आले आहे. तसेच कारवाईचा धडाका सुरूच राहणार असल्याचा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : ॲपल बोर जास्त खाल्याने 65 मेंढ्यांचा मृत्यू: छत्रपती संभाजीनगरमधील घटना