Chhatrapati Sambhaji Nagar News : गुढीपाडवा (Gudi Padwa) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने राज्यातील एक कोटी 58 लाख शिधाधारक कुटुंबांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) देण्याची घोषणा केली आहे. मात्र राज्यात गेल्या सात दिवसांपासून शासकीय कर्मचाऱ्यांचे सुरु असलेल्या संपामुळे आनंदाचा शिधा अद्याप पूर्णपणे जिल्हास्तरावर पोहचला नसल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) शासकीय गोदामात रवा पोहचला आहे. पण साखर, गोडतेलसह डाळ अजूनही पोहचलेली नाही. त्यामुळे आता पाडव्याला अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने आनंदाचा शिधा सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता मावळत चालली आहे. 


गुढीपाडवा अवघ्या दोन दिवसावर आलाय, मात्र राज्य सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधा अजूनही पूर्णपणे पोहोचू शकलेला नाही. छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय गोडाऊनमध्ये आतापर्यंत फक्त रवा आला आहे. तर साखर, पामतेल आणि डाळीची प्रतीक्षा कायम आहे. तर ग्रामीण भागामध्ये एकूण गरजेपैकी फक्त दहा टक्के पुरवठा झाला आहे. अजूनही रवा 90 टक्के येणे बाकी आहे. तसेच इतर पदार्थांची देखील प्रतीक्षा आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळणार नाही, असं चित्र दिसतंय. 


अजून साखर, चणाडाळ आणि पामतेल आले नाहीत 


गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने शंभर रुपयांत आनंदाचा शिधा (Anandacha Shidha)  देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा शिधा खाजगी वितरकांकडून खरेदी केला जात आहे. काही ठिकाणी जिल्ह्याच्या शासकीय गोदामांमध्ये शिधा दाखल झाला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय गोडाऊनमध्ये आतापर्यंत फक्त रवा पोहचला आहे. अजून साखर, चणाडाळ आणि पामतेल आले नाहीत. विशेष म्हणजे पूर्णपणे आनंदाचा शिधा जरी पूर्णपणे पोहचला नसला तरीही, ज्या पॅकेटमधून हे वस्तू दिले जाणार आहेत ते मात्र पोहचले आहेत. 


'आनंदाचा शिधा'चे पॅकेट बदलले...


यापूर्वी दिवाळीत देखील आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. पण त्यावेळी ज्या पॅकेटमधून शिधा देण्यात आला होता, ते यावेळी बदलले आहे. यावेळी आलेल्या आनंदाचा शिध्याचे पॅकेट निळ्या रंगात आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो आहेत. सोबतच एका बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि दुसऱ्या बाजूला गुढीचा फोटो आहे. तसेच 100 रुपयात आनंदाचा शिधा असे लिहले आहेत. सोबतच यात रवा 1 किलो, चणाडाळ 1 किलो, साखर 1 किलो आणि पामतेलचा 1 पॅकेट असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 


संबंधित बातम्या :


Anandacha Shidha : पाडवा तोंडावर आनंदाचा शिधा मात्र शासकीय गोदामांमध्येच पडून, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाटपात अडथळा