छत्रपती संभाजीनगर : सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धूम आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आपल्याच पक्षाच्या नेत्याचा विजय व्हावा, यासाठी त्या-त्या पक्षाचे नेतेमंडळी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) शिवसेना विरुद्ध  (Shivsena Vs Shivsena)शिवसेना अशी लढत होणार आहे. या जागेवर महायुतीकडून मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) तर महाविकास आघाडीडून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे उभे आहेत. दरम्यान, भुमरे यांच्या प्रचारसभेत बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची जीभ घसरली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करताना त्यांनी थेट शिवराळ भाषेचा वापर केला. 


संजय शिरसाट यांची जीभ घसरली 


छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 एप्रिल रोजी महायुतीचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तसेच भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेवर बोलताना त्यांची जीभ घसरली. मुख्यमंत्री अनेकदा म्हणाले जो राम का नही वो किसी काम का नही. जा भो*** असं संजय शिरसाट जाहीर सभेत म्हणाले. विशेष म्हणजे माझी जिभ घसरली. माध्यमं काहीही वृत्त देतील, असंदेखील शिरसाट म्हणाले. 


संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले? 


मी खैरे यांची मिरवणूक पाहिली. मला या सभेत अनेक वेगवेगळे चेहरे दिसली. गेल्या चाळीस वर्षांत मी हे चेहरे पाहिले नव्हते. ही रॅली पाहून मला दु:ख होत होतं. ही कसली रॅली, असा प्रश्न मला पडत होता. जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत आमची रॅली निघायची. गर्व से कहो हम हिंदू हैं, असं आम्ही म्हणायचे. पण आता त्या रॅलीत सगळेच दिसत आहेत. काय चाललंय हे मला सजत नाहीये. 


जो राम का नही, वो...


आमच्याकडे मु्स्लीम बांधव आहेत. ते आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. वेळेनुसार बदलणारी औलाद आम्हाला नको आहे. लाचारी कशासाठी करायची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक घोषणाच केली आहे. जो राम का नही, वो किसी काम का नही, जाओ भो***. जीभ घसरली. हे टीव्हीवाले नंतर काहीही म्हणतील.


पायाला लागलं म्हणून सर्व कार्यक्रम रद्द केले


पुढे बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. आपलं एक ध्येय्य आहे. आपलं एक धोरण आहे. आपण जे करणार आहोत, ते मनापासून करत आहोत. जे मनापासून करत नाहीत, त्यांच्यासोबत काय घडतं हे आपण काल पाहिलेलं आहे. काल त्यांच्या रथातून एकजण पडला. जे महाराष्ट्राचे नेतृत्व करायला निघालेत ते काल पडले. पायाला मार लागला म्हणून ते त्यांनी आज सगळे कार्यक्रम रद्द केले, अशी बोचरी टीका संजय शिरसाट यांनी केली.


संजय शिरसाट काय म्हणाले? पाहा व्हिडीओ!



हेही वाचा :


मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!