Chhatrapati Sambhaji Nagar Health News : महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) अनेकांचे आजार मोफत बरे केल्याचा दावा शासनाकडून केला जातो. मात्र, छत्रपती संभाजी नगरच्या एका रुग्णालयाने याच योजनेत जर आपला रुग्ण बरा करायचा असेल तर 20 हजार रुपयांची मागणी केली आणि ते हॉस्पिटलच्या समोरील एक हॉटेल मालकाकडे जमा करायला सांगितले. रुग्णाच्या नातेवाईकाला ही बाब खटकली आणि त्याने हा सगळ प्रकार कॅमेरात कैद करून आरोग्य विभागाकडे रीतसर तक्रारही केली आहे. जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी याचं एक्सकलुसिव्ह स्टिंग ऑपरेशन केलं आहे.


शासकीय योजनेत उपचार घेण्यासाठी 20 हजारांची लाच


छत्रपती संभाजी नगरच्या बीड बायपासवर असलेल्या अल्पाईन हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेत उपचार घेण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेण्यात आली. हे स्टिंग ऑपरेशन खुद्द रुग्णांच्या नातेवाईकांनीच केलं आहे. स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ समोर आलं आहे. शासकीय योजनेत ऑपरेशन बसवण्यासाठी पैसे स्वीकारणारा हा कोणी डॉक्टर किंवा हॉस्पिटलचा अकाउंटंट नसून रुग्णालयासमोरचा हॉटेल चालक आहे. उपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकाकडून पैसे घेऊन ते डॉक्टरला मिळाल्याचं हा हॉटेल सांगतोय. रुग्णांच्या नातेवाईकाकडे या स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडीओसोबतच तर, या हॉस्पिटलमध्ये असलेल्या पठाण नावाच्या डॉक्टरांचा कॉल रेकॉर्डिंग देखील आहे.


हॉस्पिटलच्या बाहेरील हॉटेल मालकाकडे जमा केले पैसे


सत्तरी उलटलेल्या नसीम मुस्तफा शेख यांच्या हाताच्या शस्त्रक्रियेसाठी या डॉक्टरांनी पैसे घेतले आहेत, असा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. नसीम यांचा मुलाने वडीलांना 3 फेब्रुवारीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यावेळी एक योजनेत ही शस्त्रक्रिया करण्याचं निर्णय झाला. मात्र, नंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास टाळाटाळ सुरू केली, रुग्णाचं वय जास्त असल्याने शासकीय योजनेत बसत नसल्याचं कारण देण्यात आलं. धक्कादायक म्हणजे शस्त्रक्रिया योजनेत करण्यासाठी 20 हजाराची लाच घेण्यात आली, त्यासाठी पैसे हॉस्पिटलच्या बाहेरील हॉटेल मालकाकडे देण्यास सांगितलं.


नेमकं काय घडलं?


1 फेब्रुवारीला रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात आलं. रुग्णाला शस्त्रक्रिया योजनेत बसवली जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं. 5 फेब्रुवारीला रुग्णाकडून शस्त्रक्रियेसाठी 20 हजाराची मागणी करण्यात आली. 7 फेब्रुवारीला रुग्णांच्या नातेवाईकांनी 20 हजार 500 रुपये कॅन्टीन वाल्याकडे सुपूर्द केले. 8 फेब्रुवारीला रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया योजनेत बसल्याचं सांगण्यात आलं.


रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयावर गंभीर आरोप


रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एखाद्या रुग्णालयात रुग्णांना दाखल करेपर्यंत खोटे बोलून दाखल करून घ्यायचं, त्यात योजनेत शस्त्रक्रिया करण्यासाठी लाच मागायची हा प्रकार इथे सर्रास सुरू असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. 


या प्रकरणाकडे पोलिसाचं दुर्लक्ष


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर अधिकच्या पैशाचं इक्विपमेंट जर रुग्णांच्या शरीरामध्ये बसवला असेल तर, तसं योजनेत करता येतं का, जर हे अधिकृत असेल तर त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये पैसे का जमा करून घेतले नाहीत. कॅन्टीन वाल्याकडे काय दिले, यावरच हे डॉक्टरचं उत्तर आहे का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांची फसवणूक झाल्यानंतर ते तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे गेले. पोलिसांनी कारवाई करायच्या ऐवजी डॉक्टरांना फोन केला आणि हे प्रकरण बाहेर मिटवण्याचा सल्ला दिला तर, दुसरीकडे आरोग्य विभागाकडे याची तक्रार केली गेली आहे.


महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत लाखो लोकांना मोफत शस्त्रक्रिया केला, असल्याचा दावा सरकारकडून केला जातो. मुख्यमंत्री आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेखही करतात, मात्र प्रत्यक्षात इथे काय परिस्थिती आहे, हे या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. आता सरकार या रुग्णालयावर  आणि डॉक्टरांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात हे एकाच हॉस्पिटलमध्ये नाही तर, अनेक हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारची लाच दिल्याशिवाय जन आरोग्य योजनेत उपचार होत नाहीत हेही समोर आलं आहे.


पाहा स्टिंग ऑपरेशनचा एक्सक्लूसिव्ह व्हिडीओ :



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Manoj Jarange Patil : ...तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, 20 तारखेआधी निर्णय घ्या ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा