छत्रपती संभाजीनगर : आदर्श ग्रामपंचायत म्हणून राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा (Patoda) ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशपातळीवर कार्बन न्युट्रल ग्रामपंचायत श्रेणीत पाटोदा ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या काळात पाटोदा गावाची राज्यभर चर्चा सुरु होती. त्या काळात ग्रामविकासाचा पाटोदा पॅटर्न विविध ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरला होता. 


भास्करराव पेरे पाटील यांच्यानंतरही विद्यमान सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाटोदा गावाच्या आदर्शपणाचा इतिहास कायम ठेवला आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीने देशपातळीवर झेंडा रोवला आहे. पाटोदा ग्रामपंचायतीने देशपातळीवर कार्बन न्युट्रल ग्रामपंचायत श्रेणीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.  नॅशनल पंचायत अवार्ड कार्बन न्युट्रल ग्रामपंचायत पुरस्कार पाटोदा ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला आहे.


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत पाटोदा-गंगापूर नेहरीला देशातून दुसऱ्या क्रमांकाचा नुकताच नॅशनल पंचायत अवॉर्ड कार्बन न्युट्रल ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर झाला. नवी दिल्ली येथे हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  यावेळी केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील देखील उपस्थित होते. पाटोद्याचे सरपंच जयश्री किशोर दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे यांच्यासह स्थानिक अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला. त्यामुळे आता राज्यातच नव्हे, तर  देशपातळीवर तसेच जागतिक पातळीवर पाटोदा ग्रामपंचायत नावलौकिक मिळवणारी ग्रामपंचायत ठरली आहे.


पुरस्कार आणि पाटोदा ग्रामपंचायतीचे समीकरण


पाटोदा ग्रामपंचायतीने आतापर्यंत विविध प्रकारच्या 24 महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरले आहे. या ग्रामपंचायतीला पहिला पुरस्कार 2007 मध्ये मिळाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या ग्रामपंचायतीने या माध्यमातून 4 कोटींची कमाई केली आहे. तर पाटोदा गावाने आतापर्यंत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, सावित्रीबाई स्वच्छ अंगणवाडी, असे अनेक पुरस्कार मिळवले आहे. पण आतापर्यंत राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायतीने देशपातळीवर देखील आपला झेंडा रोवला आहे.


पाटोदा ग्रामपंचायतीसह महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील खंडोबाची वाडी, कुंडल, पुण्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. पाटोदा ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल या श्रेणीतील द्वितीय, तर कोल्हापूरमधील अलाबाद ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक मिळाला.


महत्त्वाच्या बातम्या:


Shirdi Saibaba : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हार फुले वाहता येणार