छत्रपती संभाजीनगर:  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar)  गंगापूर (Gangapur)  शहरात एक धक्कादायक घटना समोर आली  आहे. मूलबाळ होत नसल्यामुळे महिलेचा अमानुष छळ करण्यात आला आहे. तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा आहे, त्यामुळे मुलबाळ होत नाही. मूलबाळ होण्यासाठी तो आत्मा बाहेर काढण्याचा बहाणा करून एका विवाहितेला काठीने मारहाण अंगावर खिळे मारून तिचा अमानुष छळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे हा प्रकार घडला असून, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विवाहित महिला ही गंगापूर शहरातील आहे. महिला 35 वर्षाची आहे लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतर देखील महिलेला मूलबाळ होत नसल्याने घरात तीला सतत अपमानास्पद वागणूक मिळत असे.मूलबाळ होण्यासाठी अनेक उपाय देखील करण्यात आले. सतत होणाऱ्या छळाला महिला कंटाळली होती. अखेर जवळच्या एका नातेवाईकांनी तुझ्या अंगात तृतीयपंथीयचा  आत्मा आहे, तो बाहेर काढण्यसाठी जादूटोणा करण्याचा सल्ला दिला.


तब्बल दोन वर्षे सुरु होता अघोरी प्रकार 


नातेवाईकांनी  सांगितलेला सल्ला ऐकून महिला जादूटोण्याचे विधी  करण्यास तयार झाली. पिडीत महिलेला विश्वासात घेतल्यानंतर हा विधी करण्यासाठी महिलेला जामगावला नेण्यात  आले. जामगाव येते गेल्यानंतर महिलेला अंगातील आत्मा बाहेर काढण्यासाठी काठीने मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतरही आत्मा बाहेर निघत नाही, असे म्हणत तिच्या अंगावर खिळे मारण्यात आहे. एक दोन नाही तर तब्बल दोन वर्षे हा अघोरी प्रकार सुरू होता. डिसेंबर 2022 ते एप्रिल 2024 पर्यंत हा अत्याचार सुरू होती. शेवटी छळ सहन न झाल्याने महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली आहे.


आरोपींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल


पोलिसांनी झालेल्या अघोरी प्रकाराची गंभीर दखल घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अघोरी आणि अनिष्ट प्रथा,नरबळी, अमानुष अत्याचार, जादुटोण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. आरोपींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकारानंतर संताप व्यक्त करण्यात येत असून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकाराचा पोलीस अधिक तपास करत आहे.   


हे ही वाचा : 


आधी म्हणाले बायको शेती करते, आता म्हणतात पत्नीच्या नावावर दारू विक्रीचे 2 परवाने; दोनच दिवसात भुमरेंनी केला प्रतिज्ञापत्रात बदल