छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी राज्यभरात गाजलेला शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही, याविषयीचा अहवाल सादर करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व केंद्रप्रमुखांना दिले आहेत. विशेष म्हणजे सर्व शिक्षकांकडून याबाबत माहिती भरून घेत, 30 नोव्हेंबरपर्यंत गटशिक्षणाधिकारी कार्यालयास केंद्रप्रमुखांनी याचा अहवाल सादर करण्याचे देखील आदेशात म्हटले आले. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याचा मुद्दा समोर आल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. 


छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही याची खात्री करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुखांना महत्वाचे आदेश दिले आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही, याची माहिती शिक्षकांकडून भरून घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत हा अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रप्रमुखांना दिला गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. 


अन् एकही शिक्षक मुख्यालयी राहत नव्हता...


दरम्यान, 20 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या कचनेर तांडा येथील नंबर दोन प्राथमिक शाळेला सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी भेट दिली होती. त्या शाळेच्या तपासणीत एकही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच भेटीदरम्यान गावच्या सरपंचांनी एकही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही याची खात्री करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शिक्षकांनी मुख्यालयी राहत असल्याचे पुरावे केंद्रप्रमुख यांच्या मार्फत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 


प्रशांत बंब यांनी केला होता विरोध...


मागील काही दिवसांपासून शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भाजप आमदार यांनी शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा मुद्द उपस्थित केला होता. यासाठी त्यांनी अधिवेशनात देखील आवाज उठवला होता. तसेच त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करून कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे आमदार बंब विरुद्ध शिक्षक असा संघर्ष देखील पाहायला मिळाला होता. तसेच शिक्षकांनी रस्त्यावर उतरून बंब यांच्या विरोधात आंदोलन सुद्धा केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


शिक्षकांच्या मुख्यालयाचा मुद्दा बंब यांची वैयक्तिक भूमिका; भाजप नेत्यांनी हात झटकले


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI