Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar  City) एक आगळीवेगळी घटना समोर आली असून, चक्क एका आंबे विक्रेत्या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. ज्यात गळ्यातील 25 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 50 हजार रुपयाचे कानातील टॉप्स, 10 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या दोन पाटल्या तर 4 हजार रुपये रोख असा एकूण 89 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीने लंपास केला आहे. तर या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अधिक माहिती अशी की, साहेबांना आंबे आवडतात तुझ्या टोपलीतील सर्व आंबे साहेब विकल घेतील अशी थाप मारत एकाने आंबे विक्रेत्या महिलेला मोटरसायकलवर बसविले. तिला झाल्टा फाट्यावर नेत लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 8 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती शेंद्रा एमआयडीसी भागातील टाकळी रोडवरील पेट्रोल पंपाच्या कच्च्या रस्त्याने डोक्यावर टोपली घेऊन आंबे घेऊन जात होती. 


दरम्यान याचवेळी एक 35 वर्षाचा अनोळखी इसम मोटरसायकल वर बसून तिथे आला. माझ्या साहेबांना गावरान आंबे खूप आवडतात, तू आंब्याचे टोपले घेऊन माझ्या गाडीवर बस. मी तुला साहेबांकडे घेऊन जातो असे म्हणाला. तसेच तुझे सगळे आंबे विकत घेतील, अशी थाप मारली. आरोपीवर विश्वास ठेवून महिला मोटरसायकलवर बसली. आरोपीने मात्र झाल्टा फाट्यावर गेल्यावर खरे रंग दाखविले. 


जीवे मारण्याची धमकी देऊन लुटले... 


झाल्टा फाट्यावर गेल्यावर दुचाकीस्वाराने तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र कानातील टॉप्स व हातातील चांदीच्या पाटल्या काढ नाहीतर तुला जिवंत मारून टाकेन अशी धमकी दिली. महिलेच्या गळ्यातील 25 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 50 हजार रुपयाचे कानातील टॉप्स, 10 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या दोन पाटल्या तर 4 हजार रुपये रोख असा एकूण 89 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीने लंपास केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. 


विश्वास ठेवणं महागात पडले... 


तक्रारदार महिला आंबे विकून उदरनिर्वाह करते.  8 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती शेंद्रा एमआयडीसी भागातील टाकळी रोडवरील पेट्रोल पंपाच्या कच्च्या रस्त्याने डोक्यावर टोपली घेऊन आंबे घेऊन जात होती. याचवेळी तिथे अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आला आणि सर्व आंबे विकत घेण्याची थाप मारली. तर आपली सर्व आंबे एकाचवेळी विकून जाईल या अपेक्षेने महिलेने देखील तिच्यावर विश्वास ठेवला. पण विश्वास ठेवणं महिलेला महागात पडले आणि तिची फसवणूक झाली. सोबतच  एकूण 89 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीलाही गेला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


जुगार अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करणाऱ्यावर चक्क विनयभंगाचा गुन्हा; संभाजीनगर पोलिसांचा 'हम करो सो कायदा'?