औरंगाबाद : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठणच्या मुरमा फाटा येथे वाळूच्या हायवाने प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात 13 जण जखमी झाले असून त्यामध्ये 8 वृद्धांचा समावेश आहे. जखमी झालेले लोक हे मुरमा आणि कोळीबोडखा येथील असल्याची माहिती आहे.
वाळूच्या हायवाने रिक्षाला धडक देताच हायवा चालक गाडीसह घटनास्थळावरून फरार झाला. आठ जखमींना तात्काळ पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर तर पाच जखमीना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू
भंडाऱ्याच्या दवडीपार गावाजवळ तीन दिवसांपूर्वी, 22 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. दोन भरधाव वाहन अचानक आमोरासमोर आल्याने झालेल्या या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
कुणाल सुरमवार (वय 30 वर्ष, रा. अड्याळ) असं मृतक तरुणाचं नावं आहे. तर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दिनेश बागडे (वय 29 वर्ष ) आणि मुकेश पांडेकर (वय 40 वर्ष ) यांचा समावेश असून त्यांच्यावर भंडारा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पुढील कारवाई सुरू करत या प्रकरणी कारधा पोलिसांनी संशयित आरोपी पोलीस कर्मचारी मुकेश पांडेकर याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मुकेश पांडेकर हे पवनी इथं उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहे. तर दिनेश बागडे हे पवनी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहेत. पांडेकर हे पवनी इथून त्यांच्या फोरव्हील्हर गाडीनं भंडाराकडे येत होते तर, दिनेश बागडे हे त्यांचा मित्र मृतक कुणाल सुरमवार यांच्यासह नागपूर इथून पवनीकडं पोलीस गस्त दुचाकीनं जात असताना हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तापस सध्या कारधा पोलीस करत आहेत.
ही बातमी वाचा: