Aurangabad News : मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Saatar) यांच्याविरोधात सिल्लोड शहरात रास्ता रोको करण्यात येत आहे. सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेने सहा जणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप होत असून, त्यामुळेच हे आंदोलन केले जात आहे. सिल्लोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात येत असून, यावेळी सत्तार यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून सिल्लोड नगरपरिषद आणि अब्दुल सत्तार यांना मोठा विरोध होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता आणखी एक आरोप नगरपरिषद आणि अब्दुल सत्तार यांच्यावर करत सिल्लोडमध्ये आज आंदोलन करण्यात आले आहे. राजकीय दबावामुळे सिल्लोड नगरपरिषदेने खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले आहे. सिल्लोड शहारतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्याप्रमाणात आंदोलकांची गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे यावेळी अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. "नही नही चलेंगी दादागिरी नही चलेंगी'  अशा घोषणा देण्यात आल्या. 


काय आहे प्रकरण? 


सिल्लोड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुलमधील शेख इमरान उर्फ पप्पू यांची दुकान आहे. त्यांनी सन 2002 रोजी नगरपरिषद सिल्लोड यांच्याकडून तीस वर्षाच्या भाडे करारावर त्यांनी ही दुकान घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. तर हीच दुकान तोडण्याची कोणतीही नोटीस नगरपरिषद सिल्लोड यांनी त्यांना न देता तोडण्याची हालचाली सुरु केल्या होत्या. दरम्यान, याची माहिती मिळाल्याने शेख यांनी सिल्लोड न्यायालयात स्थगिती आदेश मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाच्या निकाल येण्यापूर्वीच नगरपरिषदेने शेख यांनी दुकान जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे शेख यांनी पोलिसात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी उलट शेख यांच्यासह पाच ते सहा लोकांवर शासकीय कामात अडथळे आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केल्याचा आरोप होत आहे. 


सर्व पक्षीय नेते रस्त्यावर? 


सिल्लोड नगरपरिषदकडून गुन्हे दाखल करण्यात आल्याने यावरून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. तर याविरोधात आज सिल्लोड शहरात आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी शिंदे गट सोडून इतर सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होतांना पाहायला मिळाले. दरम्यान, यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर, पोलिसांकडून देखील यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


औरंगाबाद शहरात दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या दुधाचे नमुने तपासले जाणार, भेसळ थांबवण्यासाठी घेतला निर्णय