औरंगाबाद : रिकामा ट्रक घेऊन भिवंडीहून औरंगाबादकडे (Aurangabad) जाणाऱ्या ट्रकचालक आणि वाहकास कार आणि दुचाकी आडवी लावून लुटल्याची घटना शनिवारी (12 ऑगस्ट) रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास वैजापूर- गंगापूर मार्गावर घडली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाचे चक्रे फिरवत अवघ्या 48 तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. श्याम शेषेराव चव्हाण (वय 37 वर्ष, रा. साळेगांवतांडा ता.जि. जालना, .मु. हरीगोविंदनगर, खरपुडीरोड, जालना), गणेश शांताराम रोकडे (रा. जिकठाण ता. गंगापूर) अविनाश रघूनाथ खंडागळे (रा. कानडगांव ता. गंगापूर), बाबासाहेब विष्णू देवकर (रा. सिध्दापूर ता. गंगापूर) विशाल उर्फ देवा रामभाऊ पवार (रा. सिध्दापूर ता. गंगापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावं आहेत.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकांना गावठी कट्टा दाखवून लुटण्यात आल्याच्या घटनेचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सतीष वाघ यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत चोरांची माहीती मिळाली होती. जालना जिल्ह्यातील श्याम शेषेराव चव्हाण याने त्याच्या साथीदारसह हा गुन्हा केल्याची माहिती वाघ यांना मिळाली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथे जावून सापळा रचून त्याचा शोध घेतला. दरम्यान, यावेळी श्याम चव्हाण हा वाहनासह मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपणच आपल्या साथीदारासह ट्रक चालकाला लुटल्याची कबुली दिली.


चव्हाण याने गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी इतर आरोपींचं शोध सुरु केला. यावेळी गणेश शांताराम रोकडे, अविनाश रघूनाथ खंडागळे, बाबासाहेब विष्णू देवकर, विशाल उर्फ देवा रामभाऊ पवार यांना त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांची चौकशी केली असता, त्यांनी देखील गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन टाटा झेस्ट, दोन मोटार सायकल, एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत राऊंड आणि तसेच गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन असा एकूण 4 लाख 76 हजारांचा मुददेमाल देखील त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आले. तर, गुन्ह्यांचा तपास पोलीस ठाणे गंगापूर करीत असून तपासामध्ये आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.


यांनी केली कारवाई...


सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, .पो.नि.सुधीर मोटे, पो.उप.नि.विजय जाधव, पो.उप.नि.भगतसिंग दुलत, पोह. नामदेव शिरसाठ, पोह. रवी लोखंडे, वाल्मीक निकम, पोना. अशोक वाघ, पोअ.आनंद घाटेश्वर, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


CCTV in Village: औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक गाव आता CCTV च्या निगराणीत, अशी आहे पोलिसांची संकल्पना