Aurangabad Crime News : चक्क महिलांची अंतर्वस्त्रे चोरणारा विकृत युवकाला औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर महिलांचे अंतर्वस्त्रे चोरण्याचे 'वेड' लागलेल्या या विकृत तरुणाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याचे हे कारनामे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. सचिन सारंग दिंडोरे (वय 19 वर्षे, रा. सिडको वाळूज) असे या विकृताचे नाव आहे.
वाळूज परिसरात काही दिवसांपासून महिलांची अंतर्वस्त्रे चोरीला जाण्याचा प्रकार सुरु होता. घराच्या आवारात, बालकनीत वाळत असलेले अंतर्वस्त्रे गायब होत असल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र महिलांनी याची कोठेही वाच्यता केली नाही. मात्र हे प्रकार अधिकच वाढल्याने काही महिलांनी घरातल्या पुरुषांना ही माहिती दिली. मात्र अंतर्वस्त्रे चोरीची पोलिसांत कशी तक्रार देणार म्हणून नागरिकांनी पोलिसात जाण्याचे टाळले. पण याचवेळी काही नागरिकांनी चोराला पकडण्यासाठी सीसीटीव्ही लावले. दरम्यान काही ठिकाणी हा चोर सीसीटीव्हीत कैद झाला. ज्यात अंतर्वस्त्रे चोरल्यावर तो एखाद्या घरात डोकायचा. तर असे करताना तो अश्लील चाळे देखील करायचा. तर शनिवारी दुपारच्या सुमारास सारा वृंदावन सोसायटीसमोर बसलेल्या तरुणांना सीसीटीव्ही फुटेजमधील दिसलेला संबंधित भुरटा चोर जाताना दिसला आणि त्याला नागरिकांनी ताब्यात घेतले.
दरम्यान त्याला ताब्यात घेतल्यावर नागरिक मोठ्याप्रमाणात जमा झाले. महिला व नागरिकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. दरम्यान याबाबत वाळूज पोलिसांना माहिती मिळताच दामिनी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्या विकृत तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव सचिन सारंग दिंडोरे असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे आई-वडील लग्न करुन देत नसल्याने आपण असे कृत्य केल्याचे त्याने पोलीस तपासात कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सेक्श्युअल डिस्फंक्शनचा प्रकार...
यापूर्वी देखील अशाच काही घटना वेगवेगळ्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत. महिलांची अंतर्वस्त्रे चोरणे हा एक आजार असल्याचे देखील अभ्यासातून समोर आले आहे. ज्याला 'सेक्सुअल डिस्फंक्शन' या म्हटले जाते. ज्यात लाखात एखाद्याला अशी सवय जडते. असे रुग्ण महिलांच्या वस्तू चोरण्यात आणि त्याचा गंध घेण्यात आनंद मिळत असतो. खास करून नेहमीच्या ओळखीत असलेल्या महिलांच्या वस्तू सुरुवातीला लांबवल्या जातात. यावर थेरपी आणि समपदेशन हा एक उपाय असल्याचं मानसोपचार तज्ञ यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: