छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) वकिलांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. फौजदारी न्यायालये 3 ऑक्टोबरपर्यंत जुन्या इमारतीमध्ये सुरू न झाल्यास खंडपीठातील दिवाणी आणि फौजदारी कामकाजात वकिलांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. वकिलांच्या ठरावाची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे वकील संघाने खंडपीठातील दिवाणी आणि फौजदारी कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून वकिलांकडून कामबंद आंदोलन केले जात आहे. तर, 13 जिल्यातील न्यायिक प्रकियेवर त्याचा परिमाण झाला आहे. विशेष म्हणजे आता वकील संघाने आपल्या मागणीवर विनाअट चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे यावर आज काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
औरंगाबाद खंडपीठातील वकिलांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. खंडपीठातील नव्या आणि जुन्या इमारतीमधील कामावरून हे आंदोलन करण्यात येत आहे. न्यायालयाचे काही कामकाज जुन्या इमारतीमध्ये तर काही कामकाज नवीन इमारतीमध्ये सुरू आहे. त्यामुळे हे सर्व कामकाज एकाच ठिकाणी करण्याची मागणी वकील संघाने केली होती. मात्र, मागणी पूर्ण होत नसल्याने 4 ऑक्टोबरपासून वकील संघाकडून कामकाज बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, तीन दिवस उलटून देखील संबंधित प्रशासनाकडून वकील संघाच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नसल्याने संप सुरूच आहे. तर, कील संघाने आपल्या मागणीवर विनाअट चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आज प्रशासन आणि वकील संघात काही चर्चा होत्ते का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
13 जिल्यातील न्यायिक प्रकियेवर परिणाम
औरंगाबाद खंडपीठात सुरु असलेल्या वकिलांच्या आंदोलनाचे परिणाम मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह 13 जिल्यातील न्यायिक प्रकियेवर होत आहे. त्यामुळे संप काळातील याचिकांवर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. दरम्यान, 4 ऑक्टोबर रोजी 'फ्रेश अॅडमिशन' या कॅटेगरीत सुनावणीसाठी ठेवण्यात आलेल्या 35याचिका दोन आठवड्यानंतर त्याच कॅटेगरीत सुनावणीसाठी ठेवण्याचा आदेश खंडपीठाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिला.
काय आहे प्रकरण?
जुनी ईमारत असतांना नवीन ईमारत तयार करण्यात आली आहे. जुन्या ईमारतमध्ये 15 कोर्टरूम असून त्यातील 4 कोर्टरूम खाली आहे. त्याठिकाणी बसण्यासाठी न्यायाधीश नाहीत. आता नवीन ईमारतमध्ये 12 कोर्टरूम बांधण्यात आले आहेत. ज्यात क्रिमिनलचे 5 कोर्टरूम स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच सिव्हील कोर्ट जुन्या ईमारतीत ठेवण्यात आले आहे. या दोन्ही ईमारतमध्ये पायी जाण्यासाठी किमान आठ ते दहा मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे एकाचवेळी वकिलाचे क्रिमिनल आणि सिव्हील प्रकरण असल्यास त्याने तिथे कसं उपस्थित राहावे, असा प्रश्न वकिलांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वच कोर्ट एकाच ठिकाणी ठेवावे अशी मागणी वकिलांची होती. मग ते जुन्या ईमारत मध्ये ठेवा किंवा नवीन ईमारतमध्ये ठेवा, पण एकाच ठिकाणी ते असले पाहिजे अशी मागणी वकील करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! औरंगाबाद खंडपीठातील वकिलांकडून 'कामबंद आंदोलना'ची हाक