Tadoba National Park, Andhari Tiger Reserve India : नागपूर : सलगच्या सुट्ट्या आणि ख्रिसमसनिमित्त पर्यटकांनी पर्यटनस्थळी गर्दी केली आहे. कोकणापाठोपाठ चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली आहे. निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्याप्रमाणात पर्यटक ताडोबामध्ये दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. त्यामुळे पर्यटकांना बुकिंग्स घरबसल्या ऑनलाईन करता येतात. त्यामुळे ताडोबाला पोहोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.


ख्रिसमस आणि नव्या वर्षानिमित्त आलेल्या सलगच्या सुट्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक ताडोबात मुक्कामाला आले आहेत. त्यामुळे या परिसरात उत्साह ओसंडून वाहतोय. हिवाळ्याची गुलाबी थंडी, हिरवंगार जंगल, पशुपक्ष्यांचा किलबिलाट आणि सोबतीला ख्रिसमस-न्यू इयर निमित्त आलेली सुट्टी. ताडोबाचं निसर्ग सौंदर्य अनुभवायला अजून काय पाहिजे. हाच विचार करून संपूर्ण राज्यातून पर्यटक सध्या ताडोबात डेरे-दाखल झाले आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे पर्यटकांना त्यांची सर्व बुकिंगस घरी बसल्या ऑनलाईन करता येतात. त्यामुळे ताडोबाला पोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. जवळपास 2 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी प्रसिध्द असलं तरी शेकडो प्रकारचे पशु-पक्षी, फुलपाखरं, झाडं-वेली पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. हिवाळ्यात तर ताडोबाच्या या सौंदर्याला आणखीनच साज चढलाय. त्यामुळे अनेक पर्यटक इथला निवांत पणा अनुभवण्यासाठी ताडोबाला भेट देतात.


तळकोकणातील शिरोडा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी


नाताळच्या सुट्टीत पर्यटकांचा ओघ कोकणातील समुद्र किनाऱ्यावर दिसत आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेळागर - शिरोडा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे. तसेच देवबाग, तारकर्ली, मालवण, चिवला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे. सलगच्या सुट्या असल्याने आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी कोकणातील समुद्र किनाऱ्यावर होत आहे. पर्यटक समुद्री जलक्रीडा सोबत उंठा वरून आणि घोड्या वरून सफर करत आहेत. 


तळकोकणातील रेडी मधील व्दिभूजा गणपती मंदिरात पर्यटकांची गर्दी


विकेंड आणि नाताळच्या सलगच्या सुट्या असल्याने पर्यटक कोकणातील समुद्र किनारे, गडकिल्ले, मंदिरा मध्ये गर्दी करत आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील रेडी गावातील व्दिभूजा गणपतीचे मंदिर धार्मिक पर्यटन स्थळ बनले आहे. रेडी-नागोळावाडी येथील सदानंद कांबळी हे एप्रिल 1976 मध्ये ट्रकमधून खणीज माल नेत होते. आता मंदिर असलेल्या परिसरात आले असता त्यांना झोप आली. यावेळी गणपती त्यांच्या स्वप्नात आला आणि आपण जमिनीखाली असल्याचा साक्षात्कार करून दिला. कांबळी यांनी ग्रामस्थांना ही बाब सांगितली. यानंतर ग्रामदैवताला कौल लावून खोदकाम सुरू करण्यात आले. यावेळी गणपतीची जांभा दगडात कोरलेली देखणी आणि भव्य मूर्ती सापडली. अखंड जांभा दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच आणि साधारण तीन फूट रूंद आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. मूर्तीचा एक हात आशिर्वाद देत असून दुसर्‍या हातात मोदक आहे. आख्ययिका एकूण पर्यटक मोठया श्रध्देने या मंदिरात भेट देत आहेत.