Nana Patole on State Govt : मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा (Heavy rain) खूप मोठा तडाखा बसला आहे. लाखो हेक्टरवरील शेतीच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारनं तत्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यातील दोन लोकांचे असंवैधानिक सरकार स्वतःच्या मस्तीत असून, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नसल्याचे म्हणत पटोलेंनी सरकारवर टीका केली. 


सत्तेच्या उन्मादात असलेल्या सरकारला लोकशाही पद्धतीनं घरी पाठवू


काँग्रेसतचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. राजुरा तालुक्यातील पूरग्रस्त शेत शिवारांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला. रस्ता चिखलाचा असल्याचे पाहून नाना पटोले आणि अन्य नेत्यांनी बैलगाडीतून पाहणी केली. राज्यामध्ये साडेदहा लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झालं असल्याची माहिती देकील यावेळी नाना पटोले यांनी दिली. राज्यातील दोन लोकांचे असंवैधानिक सरकार स्वतःच्या मस्तीत असून अद्याप शेतकऱ्यांना मदत केली नसल्याचे पटोले म्हणाले.  सत्तेच्या उन्मादात असलेल्या या सरकारला लोकशाही पद्धतीनं घरी पाठवू असेही पटोले म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये असं आवाहन यावेळी नाना पटोले यांनी केलं. अतिवृष्टीमुळं  विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची गरज आहे. त्यामुळं सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केव्हा मदत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


चंद्रपूर जिल्ह्यात 22 ते 23 हजार हेक्टरवरील जमिन पाण्याखाली


चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 22 ते 23 हजार हेक्टरवरील जमिन पाण्याखाली आली आहे. त्याठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्या ठिकाणच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक नागरिकांची घरं पडली आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील दोन लोकांचे सरकार स्वत: च्या मस्तीत गुल असल्याचे पटोले म्हणाले. दरम्यान, काँग्रेस पक्ष अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबरीपणानं उभा आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. मदतीसाठी आम्ही सरकारशी दोन हात करणार आहोत. 1 तारखेला मी मुंबईला जाणार आहे. त्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या सचिवांना भेटमार आहे. तत्काळ शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करणार असल्याचे पटोलेंनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: