चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूर्ती (Chandrapur Airport) नव्याने उभारण्यात येत असलेले ग्रीनफिल्ड एअरपोर्ट ... देशातील 21 ठिकाणी ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याचा नागरी उड्डाण मंत्रालयाने निर्णय घेतला होता. मात्र यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील मूर्ती या ठिकाणी विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीने नकार दिला आहे. विमानतळाच्या प्रस्तावित जागेत वन्यप्राण्यांचा विशेषतः वाघांचा अधिवास असल्याने आणि हा Tiger Corridor असल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
देशातील कुठल्याही प्रकल्पाला वन विभागाचा हिरवा कंदील आवश्यक आहे. वन विभागाकडून हिरवा कंदील मिळण्याचा दृष्टीने केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीचा होकार मिळणं आवश्यक असतं. मूर्ती विमानतळासाठी जवळपास 63 हेक्टर वनजमीन दिली जाणार होती. या साठी 7 जुलैला दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने आपली बाजू जोरदार पणे मांडली मात्र वाघांचा अधिवास धोक्यात येऊ नये म्हणून हा प्रस्ताव नाकारण्यात आला.
वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास
मूर्ती विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार मूर्ती येथील विमानतळाचा परिसर वन्यजीवांचा भ्रमण मार्ग म्हणून दाखविला आहे. त्यामुळे या विमानतळाला वन्यजीव प्रेमींचा आधीच विरोध होता. त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्याने वन्यजीव प्रेमींनी या निर्णयाचं स्वागत केलंय.
सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आहेत. चंद्रपुरात थर्मल पॉवर स्टेशन आहे. नैसर्गिक संपत्तीने या जिल्ह्यात अनेक औद्योगिक प्रकल्प येण्यास इच्छुक आहेत. चंद्रपूर जिल्हा हा देशातील अग्रगण्य औद्योगिक जिल्हा आहे. देशाला सर्वाधिक कोळसा, वीज, कागद आणि सिमेंट या जिल्ह्यातून मिळतो. राज्याच्या राजधानीपासून शेवटच्या टोकावर असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळाचे स्वप्न साकारण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आणि राजुरा तालुक्यातील मूर्ती परिसरातील जागेची निवड केली.
औद्योगिक विकासासाठी विमानतळं आवश्यक
चंद्रपूर जिल्ह्यात जंगल, वीजप्रकल्प आणि कोळसा खाणींमुळे विमानतळासाठी जागा मिळणं कठीण झालंय. मात्र चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी विमानतळं आवश्यक असल्याने त्याची ही मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे यावर काहीतरी सुवर्णमध्य काढणे गरजेचं आहे.
हे ही वाचा :