चंद्रपूर : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जंगल सफारी करण्याकडे पर्यटकांचा कल वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच जगप्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील (Chandrapur) ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची (Tadoba Andhari Tiger Reserve) सफारी देखील 30 नोव्हेंबरपर्यंत हाऊसफुल्ल झाल्याचं पाहायला मिळतंय. 30 नोव्हेंबरपर्यंतचे 100 टक्के फुल्ल झाले आहे. इतकेच नव्हे तर नाताळमधील बुकिंग देखील आताच करत नाताळमधील बुकिंग देखील फुल्ल झाल्याचं सांगण्यात येत आहे. नोव्हेंबरच्य पहिल्या दहा दिवसांत 7 हजार पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली. त्यातच कोअर झोनचे 6 आणि बफर झोनच्या 19 प्रवेशद्वारावरील बुकिंग पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात येतय. पावसाळ्यानंतर या सफारीची सुरुवात होताच पर्यटकांनी बुकिंग केलं होतं. 


चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगभरातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिले आहे. पट्टेदार वाघांची भूमी म्हणून ताडोबा ओळखलं जाते. पट्टेदार वाघाचं हमखास दर्शन इथं होत असल्यानं पर्यटकांसोबतच हौशी छायाचित्रकारही मोठ्या संख्येनं इथं हजेरी लावतात. ताडोबा-जंगलात प्राण्यांना नावे देण्याची एक अलिखित प्रथा आहे.


 इतरत्रही पर्यटकांची मोठी गर्दी


दिवाळीच्या लागोपाठ सुट्ट्या आणि हिवाळ्यातील जंगल सफारीचा उत्तम काळ यामुळे व्याघ्र प्रकल्पानां भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये तरुणांची संख्या विशेष आहे. देशासह जगभरातील पर्यटकांना कायम आकर्षित करणारं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाशिवाय इतर नवेगाव नागझिरा, उमरेड कराडला, टिपेश्वर, बोर, इत्यादी व्याघ्र प्रकल्पांना देखील पर्यटकांनी पसंती दिली आहे. दिवाळीच्या तीन महिन्यांपासूनच पर्यटकांनी नोंदणी केल्यानं सध्याच्या घडीला व्याघ्र प्रकल्प जवळजवळ फुल झाले आहेत. 


नवेगाव-नागझिरातील चोरखमारा परिसरात पर्यटकांना वाघाचं दर्शन


गोंदिया जिल्हात नवेगाव-नागझिरा हा एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक हे वाघ आणि इतर प्राणी पाहण्यासाठी हौसेनं येतात. दिवाळीच्या सुट्टी निमित्त नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटकांना सतत 4 दिवसांपासून वाघाचं दर्शन होत आहे. तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह संचारला असून दररोज पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.


काही महिन्यांपूर्वी ताडोबातील ऑनलाइन बुकिंगमध्ये काही घोटाळा झाल्यमुळे ऑनलाइन बुकिंग बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान यामुळे  रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालकांना मोठा फटका बसला होता. पण काहीच दिवसांत हे बुकिंग पुन्हा चालू करण्यात आले. दरम्यान सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आता हे ऑनलाइन बुकिंग फुल्ल असल्याचं पाहायला मिळतंय. 


हेही वाचा : 


लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे विदर्भातील व्याघ्र प्रकल्प, पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल