Chandrapur Food Poisoning : पोलीस प्रशिक्षण (Police Training) पूर्ण करून आलेल्या 41 पोलिसांना जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  बहुतांश पोलिसांवर प्रथमोपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. तर, 3 पोलिस जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital)  दाखल आहेत. रविवारी दुपारी पोलीस फुटबॉल मैदानावरील पोलीस कॅन्टीनमध्ये (Police Canteen) 200 पोलिसांनी जेवण केले होते. त्यातील 41 पोलिसांना जेवणानंतर  उलट्या होण्यास सुरवात झाली. त्यामुळे, तात्काळ पोलिसांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुपारी जेवणात खाललेल्या चिकनमधून (Chicken) ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 


चंद्रपुरात पोलिसांना चिकन खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. यातील 3 पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी पोलिस फुटबॉल मैदानावरील पोलिस कँटीनमध्ये 200 पोलिसांनी जेवण केले. त्यातील 41 जणांना जेवणानंतर उलट्या झाल्या. हा सर्व प्रकार लक्षात येताच त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 39 पोलिसांना प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली असून, 3 पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतरही बाधित पोलिस रुग्णालयात दाखल होत असल्याने बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 


पोलिस कँटीनमध्ये खाल्ले चिकन


अधिक माहितीनुसार रविवारचा दिवस असल्याने कँटीनमध्ये चिकन बनवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी जेवण केल्यावर लगेच त्यांना उलट्या सुरू झाल्या आणि पाहता पाहता आकडा वाढला. एकच गोंधळ सुरु झाला. उलट्या होणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, उन्हामुळे कदाचित चिकन खराब झाले असल्याने हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांचा अंदाज आहे. 


उपवासात शिंगाड्याचं पीठ खाणाऱ्या भाविकांना विषबाधा 


नागपुरात देखील अनेक ठिकाणी विषबाधाच्या घटना समोर आल्याचे चित्र रविवारी दिवसभर पाहायला मिळाले. उपवासाचे पदार्थ खाल्याने जवळपास 124 जणांना विषबाधा झाली आहे. शहरात महाशिवरात्री निमित्त उपवासात शिंगाड्याचं पीठ खाणाऱ्या भाविकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरातील हिंगणा, कामठी या दोन तालुक्यात सर्वधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे. या भागातील तब्बल 100 पेक्षा अधिक नागरिकांना विषबाधा झाली. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाने शिंगाड्याच्या पिठाचे नमुने घेतली आहे. विशेष म्हणजे यासह आणखी काही घटनांमध्ये देखील विषबाधा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


उपवासासाठी भगर खाणार असाल तर थांबा! थेट रुग्णालयात जाण्याची येईल वेळ