Chandrapur Flood: बाप उन्हात सावली, बाप पावसात छत्री. लेकरावर काही संकट आलं तर बाप नावाचा माणूस कसलाही विचार न करता ते संकट आपल्यावर घेतो आणि आपल्या लेकरासाठी काही करायला तयार असतो. अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. येथे एका बापाने आपल्या तापाने फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन 5 किमी पायी चालत पुरातून वाट काढत त्याला दवाखान्यात नेहलं आहे.
चंद्रपूराला पावसाने वेढलं असून तिथे पासचा जोर अजूनही कायम आहे. यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा पुन्हा एकदा समोर आली आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळं पोडसा गावाला बेटाचं स्वरूप आलं आहे. त्यातच श्यामराव गिनघरे यांचा मुलगा कार्तिक तापाने फणफणत होता. गावात दवाखाना नसल्याने शामराव यांनी मुलाला कडेवर घेऊन या पुरातून वाट काढली. त्यांनी तब्बल 5 किलोमीटरचा प्रवास पायी चालत पूर्ण केला आणि वेडगाव येथील खाजगी डॉक्टरांकडे ते आपल्या मुलाला घेऊन गेले.
पुरात अडकलेल्या 22 ट्रकचालकांना वाचवण्यात आलं
दरम्यान, पुरात अडकलेल्या 22 ट्रक ड्रायव्हरला चंद्रपूर पोलिसांनी रेस्क्यू केले आहे. घुग्गुस-भोयेगाव मार्गावर आज पहाटे हे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. भोयेगाव पुलावर पाणी असल्यामुळे हे ट्रक काल दुपारपासून येथे थांबले होते. मात्र काल रात्री अचानक वर्धा नदीचे पाणी वाढल्याने थांबलेल्या ट्रकांना मागच्या बाजूने देखील पुराच्या पाण्याचा वेढा पडला. मात्र ट्रक चालकांच्या हे वेळीच लक्षात आलं नाही. त्यामुळे पोलीस विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीमने आज पहाटे सर्व ट्रकचालकांना बोटीच्या मदतीने बाहेर काढलं.
इतर महत्वाच्या बातम्या:
Eknath Shinde : गळती थांबेना! शिवसेनेचे मीरा भाईंदरमधील 18 नगरसेवक शिंदे गटात दाखल
आमच्याकडे 50 % करकपातीची मागणी करत होता, आता सत्तेत आल्यावर तुटपुंजी कपात का, पेट्रोल-डिझेल दरावरुन अजित पवारांचा हल्लाबोल
24 तासांत मुंबईतील खड्डे भरा, अति धोकादायक इमारती खाली करा, मुंबई पालिका आयुक्त चहल यांचे निर्देश