बुलढाणा : बुलढाण्यात (Buldhana) जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर सुलतानपूर नजिक खाजगी बसला (Private Bus) अपघात झाला. बस चालकाला झोप आल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी होऊन अपघात (Bus Accident) झाला. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.
चालकाला झोप आल्याने बस आधी झाडाला धडकली, नंतर पलटली
साई अमृत ट्रॅव्हल्सची बस पुण्याहून नागपूरकडे जात होती. सकाळी 7.15 वाजता अपघात झाला. बसमध्ये 35 प्रवासी होते. अनियंत्रित होऊन बस सुरुवातीला झाडाला धडकली आणि नंतर पलटी झाली. अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस आणि स्थानिकांनी जखमी प्रवाशांना मदत केली. जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी औरंगाबाद इथे नेण्यात येणार आहे.
एसटी बस आणि स्कूल व्हॅनची धडक, चालकासह 17 मुलं जखमी
तर लोणार तालुक्यातील बीबी-मांडवा मार्गावर काल (7 सप्टेंबर) एसटी बस आणि शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये चालकासह 17 मुलं जखमी झाले आहे. काल सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात. जखमींना उपचारांसाठी जालन्यात हलवण्यात आलं आहे. सहकार विद्यामंदिर शाळेतील मुलं दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी जात होती. परंतु त्याचवेळी मांडवा गावाजवळ एसटी बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट शाळकरी मुलांच्या वाहनाला धडकली. या अपघातात चालकासह 17 मुलं जखमी झाली आहेत. अपघातातील जखमी मुलं ही 6 ते 16 वर्षे वयोगटातील आहेत.
हेही वाचा
Buldhana Accident : स्टेअरिंग लॉक होऊन चालू एसटी बस पलटी, अन् बसमध्ये 25 प्रवासी