चिखली : बुलढाण्यातील अपघातांची (Buldhana Accident) मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. बुलढाणा जिल्ह्यात आज एक बस अपघात घडला आहे. एसटी बसचं (ST Bus Accident) स्टेअरिंग लॉक झाल्यानं हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पटली झाल्याची धक्कादायक घटान चिखली येथे घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळी सात वाजताच्या सुमारात एसटीचा अपघात झाल्याची माहिती आहे. बसमध्ये सुमारे 25 प्रवासी होते.


स्टेअरिंग लॉक होऊन चालू बस पलटली


प्रवाशांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याने काही जण जखमी झाले आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. बुलढाणा - सवणा ते चिखली एसटी बसला अपघात झाला. स्टिअरिंग रॉड लोक झाल्याने गाडी पलटी झाली. यामुळे चालकासह दहा ते पंधरा विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही एसटी बस सवणावरून चिखलीच्या दिशेने जात होते, त्यावेळी हा अपघात घडला. बसमध्ये विद्यार्थ्यांसह सुमारे 25 प्रवाशी प्रवास करत होते. सकाळी सात वाजेदरम्यान ही घटना घडली. 


चालक आणि प्रवासी जखमी, जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश


सकाळी सातच्या सुमारास सवणा ते चिखली बसचा अपघात झाला. बसच्या स्टेअरिंगचा रॉड लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्त बसमध्ये विद्यार्थी प्रवास करत असल्याने त्यांचे पालकही घाबरले आणि सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यासोबतच काही विद्यार्थीही जखमी झाले आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


नेमका अपघात कसा घडला?


आज सकाळी चिखली तालुक्यातील सवना येथून 25 प्रवासी घेऊन चिखलीकडे निघालेल्या बसचा स्टेरिंग लॉक झाल्याने एका वळणावर ही बस सरळ वीस फूट खोल खड्ड्यात पलटी झाली. या बस मध्ये बारा ते पंधरा विद्यार्थी देखील होते बस स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने ही बस खड्ड्यात कोसळली. या अपघातात 17 प्रवासी ज्यात 12 ते 13 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत नशीब बलवत्तर बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे .यात चालकही जखमी झाला आहे. राज्य परिवहन मंडळाच्या जुनाट व नादुरुस्त बसेस मुळे जिल्ह्यात सातत्याने अपघात होत असल्याचं समोर आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Samruddhi Mahamarg : 55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर 6 महिन्यातच खड्डे, अपघाताचा धोका वाढला