Maharashtra Samruddhi Mahamarg: नागपूर मुंबई हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे (Samruddhi Mahamarg) निर्माण होण्याआधी या महामार्गाच्या बाजूला जवळपास 14 ठिकाणी कृषी समृद्धी नवनगर अर्थात ऍग्रो स्मार्ट सिटी बसवण्याची संकल्पना राज्य सरकारनं मांडली होती. समृद्धीचा पहिला टप्पा सुरू झाला. पण या नव्या नगरांची निर्मिती अद्याप थांबली होती, परंतु आता या स्मार्ट सिटीच्या तयार करण्याच्या प्रकल्पाला आता वेग आल्याचं समजत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पच्या नियोजित जागेची काल केंद्रीय पथकाकडून अचानक पाहणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


समृद्धी महामार्गावरील नागपूर जिल्ह्यातील विरुल आणि बुलढाणा जिल्ह्यातील माळ सावरगाव येथे प्रस्तावित कृषी समृद्धी नवनगर अर्थात स्मार्ट सिटी प्रकल्पच्या नियोजित जागेची काल केंद्रीय पथकाकडून अचानक पाहणी करण्यात आली. केंद्र सरकारचा परफॉर्मन्स चॅलेंज फंड कोणत्याही नव्या प्रकल्पाला मिळवण्यासाठी सर्वप्रथम हैदराबाद येथील ए. एस. सी. आय. या संस्थेच्या तज्ज्ञ अधिकारी प्रकल्प स्थळाची पाहणी करून आपला अहवाल केंद्र सरकारकडे पाठवतात, त्यानंतर केंद्र सरकारकडून अशा प्रकारच्या नव्या प्रकल्पांना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. त्या अनुषंगानं ही पाहणी करण्यात आल्याचं या पथकातील अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.


समृद्धी महामार्गावरील प्रकल्पांना केंद्राकडून निधी मिळण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गावरील नागपूर जिल्ह्यातील विरुल आणि बुलढाणा जिल्ह्यातील माळ सावरगाव येथे स्मार्ट सिटी प्रकल्पच्या नियोजित जागेची काल केंद्रीय पथकाकडून अचानक पाहणी करण्यात आली. केंद्र सरकारचा परफॉर्मन्स चॅलेंज फंड कोणत्याही नवीन प्रकल्पाला मिळवण्यासाठी सर्वप्रथम हैदराबाद येथील ए. एस. सी. आय. या संस्थेच्या तज्ञ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येते. प्रकल्पस्थळाची पाहणी करून हे अधिकारी आपला अहवाल केंद्र सरकारकडे पाठवतात. त्यानंतर केंद्र सरकारकडून अशा प्रकारच्या नवीन प्रकल्पांना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.


मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार?


सध्या नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू आहे. शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला होण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याची माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.