Sharad Pawar on Buldhana Accident :  बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर (Samruddhi Highway) झालेल्या भीषण अपघातावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी या अपघाताची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात यावी, अपघातांचे परीक्षण करण्यात यावं अशी मागणी यावेळी केली आहे. 'या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात', असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मागील आठवड्यातच शरद पवार यांनी या मार्गावर होत असलेल्या अपघाविषयी काळजी व्यक्त केली होती. समृद्धी महामार्ग हा दोन टप्प्यांमध्ये सुरु करण्यात आला आहे. त्यातील पहिला टप्पा हा नागपूर ते नाशिक जो 600 किलोमीटर अंतराचा आहे. तर दुसरा टप्पा हा नाशिक ते मुंबई असा असून तो 101 किलोमीटर इतका आहे. या महामर्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे कामकाज अजूनही सुरु आहे. 


यावर बोलतांना शरद  पवार यांनी म्हटलं की,  'या महामार्ग लांबलचक असून यावर दोन्ही बाजूला कोणत्याही सार्वजनिक सुविधा उपलब्ध नाहीत', असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 'या महामर्गावर होणाऱ्या अनेक अपघांतांची तपासाणी करण्यासाठी सरकारने तज्ञांची समिती नेमली पाहिजे. तसेच हा महामार्ग लांब असल्याने  यावर अपघांतांचे प्रमाण जास्त असू शकते', असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर 'या अपघातांची तपासणी करुन आलेल्या अहवालांच्या आधारे संबंधित विभागाने उपाययोजना राबविल्या पाहिजे' अशी मागणी देखील शरद पवार यांनी यावेळी केली आहे.  


अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनानं उपययोजना कराव्यात - अजित पवार


विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या अपघातांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अजित पवार यांनी म्हटलं आहे की, 'अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं तज्ञांच्या सल्ल्यानं यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.' पुढे बोलतांना अजित पवार यांनी म्हटलं की, 'समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा.' 


बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा भागात समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळूण मृत्यू झाला आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून देखील मदत जाहीर करण्यात आली आहे.  माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास 100 जणांचा समृद्धी महामार्गवार किरकोळ आणि भीषण अपघातामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता तरी सरकार यावर काही गंभीर पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हे ही वाचा :


Sharad Pawar : ''समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो 'देवेंद्र'वासी...''; बुलढाणा बस अपघातावर शरद पवार काय म्हणाले?