Samruddhi Mahamarg News : अपघातामुळे नेहमी चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) आरटीओकडून (RTO) विशेष मोहीम राबवली जात आहे. समृद्धी महामार्गावर एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. तसेच घासलेल्या टायरच्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांची स्थिती लक्षात न घेताच वाहतूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या लक्षात आल्यानंतर आता या महामार्गावर वाहनांच्या टायर्सह वाहनांची स्थितीची ही तपासणी केल्या जात आहे.
समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी
गेल्या दहा महिन्यात तब्बल 11 हजार 500 वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात आली तर, गुळगुळीत टायर असलेल्या 200 पेक्षा अधिक वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली. त्यामुळे वाहनांची आणि टायरची स्थिती चांगली नसल्यास समृद्धी महामार्गावर जाण्याचे धाडस करू नये, असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई
समृद्धी महामार्गावर सातत्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू आहे तसेच ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे त्यामुळे वाहनधारकांनी आपले वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करावी असा आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.
नेमकी कशी होते तपासणी?
- टायर आणि टायर मधील हवेचा दाब
- वाहनाची प्रवाशी क्षमता
- इंजिनची स्थिती
- वाहनाची आपत्कालीन दरवाजांची स्थिती
- तपासणी नंतर वाहन सुस्थितीत असेल तरच पुढे पाठविण्यात येत
- चालक आणि त्याची स्थिती
- टायरमधील नायट्रोजन असावा
कशी सुरु आहे आरटीओची कारवाई
- टायर घासलेले असतील तर अतिवेगाने, उन्हाने ते फुटण्याचा धोका नाकारता येत नाही.
- टायर फुटल्यानंतर भरधाव वाहन उलटण्याचीही शक्यता असते.
- महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय झाला असून, ही तपासणी मोहीम त्यातीलच एक भाग आहे, असे सांगण्यात आले.
- तपासणी मोहिमेदरम्यान नियंत्रित वेग, सीटबेल्टचे महत्त्व आणि टायरमध्ये नायट्रोजन भरण्याबाबतही वाहनचालकांचे समुपदेशन देखील करण्यात येत.
- तसेच टायर घासलेले असेल तर त्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश दिला जात नसून, त्यांना परत पाठवले जात आहे.
शेवटच्या टप्पा जुलैपर्यंत प्रवाशांच्या सेवेत
एमएसआरडीसीकडून इगतपुरी ते आमनेपर्यंत समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचीही कामे वेगाने सुरू आहेत. सध्या या मार्गावरील 90 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. हा मार्गही जुलैपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यातून नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास समृद्धी महामार्गावरून करणे वाहनांना शक्य होणार आहे. तर उर्वरित महामार्गाची कामे जुलैपर्यंत पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :