Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघातांचं (Accident News) सत्र काही थांबण्याचं नाव घेईना.समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये. बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झालेत , या तीन अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या अपघातात चेनेज क्रमांक 283 जवळ एका कारमधले तीन प्रवासी लघुशंकेसाठी थांबले होते. त्यांच्या कारला अज्ञात वाहनानं धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात ट्रकचालकाला झोप लागल्यामुळे ट्रक महामार्गाखाली कोसळला.. यात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला.   तर तिसऱ्या अपघातात धुळ्याहून नागपूरकडे जाणारी कार उलटली, यामध्ये एकाचा मृत्यू झाला



दुसरा अपघात


दुसरा अपघात धुळ्याहून नागपूरकडे जाणाऱ्या एर्टिगा कारमधून प्रवास करणारे तिघा जणांचा  कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन अपघातात झाला. यामध्ये एकाचा  रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोघे जण जखमी आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती समोर आलेली नाही. 


तिसरा अपघात


तर नागपूर कॉरिडॉरवर मेहकर जवळ चेनेज 280 वर एका ट्रक चालकाला झोप लागल्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक बेरिअर तोडून महामार्गाच्या खाली जाऊन अपघात झाला.  या अपघातामध्ये चालक दिनेशकुमार तिवारी (रा.आझमगड)  यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 


समृद्धी महामार्गावरील अपघाताचे कारण


समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची (Samruddhi Mahamarg Accident) संख्या देखील वाढली आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या दरम्यान प्रवासासाठी लागणार वेळ कमी झाला आहे. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.   त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रांसपोस्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तीन महिने संशोधन केले. या संशोधन अभ्यासात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.  समृद्धीवरील अपघातासाठी 'महामार्ग संमोहन' जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे.  तुम्ही कधी 'महामार्ग संमोहन' हा प्रकार कधी ऐकला का? जेव्हा एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो.. कोणत्याच अडथळ्यांशिवाय, त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकमार्गे एकाच वेगात अनेक मिनिटे धावत असते......अशा परिस्थिती मध्ये तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते, तुमचा मेंदूदेखील क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्या मानवी स्थितीला 'महामार्ग संमोहन' असे म्हणतात. हा प्रकार समृद्धी महामार्गावर चालकांसोबत घडत आहे