बुलढाणा: माजी मंत्री राजेंद्र शिंगणे (rajendra shingne) यांच्या बंगल्यात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी अचानक जोरदार स्फोट झाल्याचा आवाज आला. मात्र घरात कुणीही नसल्यानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. यात किचनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं आहे. अग्निशमक दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. घटनेवेळी शिंगणे कुटुंबीय बाहेरगावी होते. स्फोटात बंगल्यातील अनेत वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी रात्री मोठा स्फोटाचा आवाज आल्यानंतर आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यावेळी बंगल्यात कुणीही नसल्याने जीवित हानी टळली आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा बुलढाणा येथे चिखली मार्गावर मोठा बंगला आहे. यात रात्री अचानक किचनच्या बाजूने मोठ्या स्फोटाचा आवाज आला व त्यानंतर किचनला आग लागली.नेमका हा स्पोट कशाचा झाला हे कळू शकलं नाही. यात किचनमधील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झालं आहे. तात्काळ सुरक्षारक्षकाने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. बुलढाणा अग्निशमन दलाने या ठिकाणी पोहचून तात्काळ आग आटोक्यात आणली. मात्र बंगल्यातील एसी, किचन मधील साहित्य यांचं मोठं नुकसान झालं आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे हे कुटुंबासह बाहेरगावी होते.
फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याची माहिती
माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या चिखली रोडवरील निवासस्थानी फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना 18 जून रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली. स्फोटानंतर लागलेल्या आगीने संपूर्ण स्वयंपाक घराचे नुकसान झाले आहे. मात्र, अग्निशमन दलाने वेळेत घटनास्थळ गाठुन आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्फोट इतका जोरदार होता की, किचनमधील फ्रिजचे कॉम्प्रेसर उडाल्याने आसपासचे साहित्य जळून खाक झाले. भिंती काळ्या पडल्या, तर इतर वस्तूंनाहीफ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने किचनचे मोठे नुकसान झाले. आगीची झळ बसली आहे. आगीमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण होते. घटनेच्या वेळी डॉ. शिंगणे नागपूर येथे कामानिमित्त होते. घटनेदरम्यान घरात त्यांचे मानसपुत्र पुष्पक शिंगणे, त्यांची पत्नी व काही कर्मचारी उपस्थित होते. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
स्फोटानंतर आगीने रौद्ररूप धारण करण्याचा धोका असतानाही पुष्पक शिंगणे यांनी प्रसंगावधान राखत घरातील गॅस सिलिंडर वेळेत बाहेर काढला, घटनेची माहिती मिळताच बुलडाणा नगरपालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले.