Jalyukt Shivar Yojana : जलयुक्त शिवार योजनेमुळं (Jalyukt Shivar Yojana) बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील अनेक गावं पाणीदार झाल्याची माहिती राज्य सरकारच्या (State Govt) वतीनं देण्यात आली आहे. जलयुक्त शिवारमुळं भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. या योजनेमुळं रब्बी हंगामात (Rabi season) पाच तालुक्यात 33 टक्के शेतकऱ्यांनी शेती बागायती केली असल्याची माहिती देखील राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे.


 जिल्ह्यातील 1 हजार 73 गावांसाठी 425 कोटी रुपयांची कामे  


राज्यातील अनेक जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 1 हजार 376 गावात जलयुक्त शिवार योजना राबवण्याचे शासनानं ठरवलं होतं. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 1 हजार 73 गावांसाठी 425 कोटी रुपयांची कामे झाली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन सरकारची जलयुक्त शिवार ही महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेमुळं बुलढाण्यातील अनेक गावे पाणीदार झाली असल्याचा दावा राज्य सरकारनं केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर, देऊळगाव राजा, मोताळा, सिंदखेडराजा  इत्यादी तालुक्यांमध्ये या योजनेचे सकारात्मक परिमाण गेल्या तीन वर्षात बघायला मिळाले आहेत. या तालुक्यात अनेक भागातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली असल्यानं शेतकरी आनंदात आहेत. सरकारनं आता जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. 


पाच तालुक्यातील 33 टक्के शेती बागायती


जलयुक्त शिवार योजनेमुळं रब्बी हंगामातील खामगाव, संग्रामपूर, देऊळगाव राजा, मोताळा, सिंदखेडराजा या पाच तालुक्यात 33 टक्के शेतकऱ्यांनी शेती बागायती केली आहे. या तालुक्यांमधील अनेक गावं दुष्काळमुक्त झाली आहेत. आता शिंदे-फडणवीस सरकारने या योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं राज्यातील अनेक गावांना याचा मोठा फायदा होणार आहे. 


पाण्याच्या पातळीत दीड ते दोन मीटरची वाढ


राज्यातील गावं दुष्काळमुक्त करण्यासाटी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014-15 साली जलयुक्त शिवार ही महत्त्वकांक्षी योजना हाती घेतली होती. या योजनेमुळं शिवारात पडणारं पाणी त्याच भागात अडवून त्याच भागात साठवून ते जमिनीत मुरवणे आणि जलपातळी वाढवणे हा उद्देश या योजनेमागे होता. बुलढाणा जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली होती. जिल्ह्यामध्ये 1 हजार 376 गावांमध्ये ही योजना राबवण्यात आली. मात्र, पहिल्या टप्प्यात 1 हजार 73 गावांमध्ये 425 कोटी रुपयांची कामे झाली आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील भूगर्भातील पाणी पातळी ही दीड ते दोन मीटरने वाढली आहे. रब्बी पिकांच्या पेरणीत वाढ झाली आहे. त्यामुळं उत्पादनातही वाढ होणार आहे. अशातच आता शिंदे-फडणवीस सरकारनं जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा हाती घेतला आहे. 
 
महत्त्वाच्या बातम्या:


Cabinet Meeting Decision : जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरु करणार, 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार; मंत्रिमंडळाने घेतलेले 16 निर्णय