Buldhana Agriculture News : राज्यात सातत्यानं वातावरणात बदल (Climate change) होत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. बदलत्या वातावरणाचा तूर पिकाला (Tur crop) मोठा फटका बसत आहे. गेल्या 15 दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळं राज्यभरातील तुरीवर 'फायटॉपथोरा ब्लाईट' या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. 


बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात यंदा खरीप हंगामात जवळपास साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. यंदा पावसाळाही चांगला झाल्यानं बुलढाणा, अकोला, वाशीमसह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तुरीच पीक अतिशय चांगलं आलं आहे. मात्र गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरात बदललेल्या वातावरणामुळं तुरीवर  फायटॉपथोरा ब्लाईट  या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. फायटॉपथोरा ब्लाईट विषाणूजन्य रोगामुळं एकाच आठवड्यात हिरवेगार असलेलं तुरीच पीक सुकलं आहे. त्यातील अपरिपक्व असणाऱ्या तुरीच मोठं नुकसान झालं आहे. राज्यात लाखो हेक्टरवरील तूर एकाच आठवड्यात सुकलं आहे. त्यामुळं यावर्षी तुरीच पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेलं असून, शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. 


राज्यात तुरीची काय स्थिती?


1) राज्यभरात या वर्षी जवळपास साडे सहा लाख हेक्टर वर तूर पेरणी केलेली आहे.

2) जवळपास 70 टक्के क्षेत्रांवर विषाणूजन्य रोगाने तूर प्रभावित झाली आहे.

3) तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात 40 टक्के तुरीच उत्पन्न असत.

4)  यावर्षी या रोगाच्या प्रादुर्भावाने जवळपास 50 ते 60 टक्के तुरीच उत्पादन घटण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहे.

5) सरासरी राज्यात 5000 मेट्रिक टन तुरीच उत्पादन होत असते.

अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका


यावर्षी राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पीक या अतिवृष्टीनं वाया गेली होती. वाया गेलेल्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, फळबागा, भाजीपाला या पिकांचा समावेश होता. यामध्ये सर्वात मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. काही ठिकाणी तर पिकांबरोबर जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. अशा अतिवृष्टीच्या तडाख्यातूनही काही शेतकऱ्यांची पीक वाचली होती. ती पीक परतीच्या पावसानं वाया गेली. त्यामुळं खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. आता शेतकऱ्यांच्या आशा या रब्बी हंगामावर होत्या. मात्र, रब्बी हंगामतही तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.


कापूस आणि सोयाबीनच्या दरात घसरण 


अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेली पीक विक्रीसाठी बाजारात येत आहेत. मात्र, सध्या शेतीमालाला योग्य प्रकारचा दर मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. कापूस आणि सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे. आधीच शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा आहे. त्यातच शेतमालाला दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. शेतीमालाल अधिकचा दर मिळण्याची अपेक्षा शेतकरी करत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : अतिवृष्टीनंतर यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर वाणू अळीचा प्रादुर्भाव, सोयाबीनसह कापूस, तूर, मिरची उत्पादक शेतकरी संकटात