बुलढाणा : आमच्या करिअरमध्ये संपूर्ण जगात आम्ही अशा प्रकारची केस पाहिली नाही असा पहिल्या दिवसाचा अहवाल आयसीएमआरच्या आयुष पथकातील सदस्यांनी दिला असल्याची माहिती आहे. शेगाव तालुक्यातील अशा प्रकारच्या केस गळती आणि टक्कल पडण्याच्या केसेस जगाच्या पाठीवर या आधी कधीही घडल्या नसल्याची माहिती आयसीएमआरच्या सदस्यांनी एबीपी माझाला दिली आहे. त्यामुळे या सर्व केसेसचा अभ्यास करून निदान करायला साधारणतः एक महिना लागणार असल्याची माहितीही या पथकाने दिली आहे. आयसीएमआर पथकाने बुलढाण्यातील केस गळती होणाऱ्या गावात भेट दिली आणि त्याचा अभ्यास केला. 


जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 ते 16 गावांमध्ये अचानक केस गळतीला सुरुवात झाली आणि त्यानंतर टक्कल पडले या संपूर्ण घटना क्रमाला आता जवळपास वीस दिवस उलटत आले आहेत. दररोज रुग्ण संख्या ही वाढत आहे. जिल्हास्तरावरून आणि राज्यस्तरावरून याचे निदान करण्याच्या प्रयत्न झाल्यानंतर केंद्राची सर्वोच्च असलेली केंद्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पथकाला या ठिकाणी या केस गळतीच निदान करण्यासाठी पाचारण कराव लागले. आयसीएमआरचं आठ जणांचं पथक या परिसरात पोहोचलं आणि त्यांनी रुग्णांची तपासणी सुरू केली.


# डॉ.मनोज मुऱ्हेकर (पथक प्रमुख , ICMR चेन्नई ) - 


केस गळती प्रकरणाच्या आज आम्ही अनेक केसेस तपासल्या त्यांच्या वेगवेगळे सॅम्पल ही आम्ही घेतले साधारणता हे सॅम्पल घेऊन आम्ही याच्या सखोल तपासण्या करणार आहोत या सर्व तपासण्या करायला कमीत कमी एक महिन्याचा वेळ लागणार आहे आणि त्यानंतर ही परिस्थिती नेमकी काय आहे ते कळणार आहे लोकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा. विविध प्रयोगशाळेत या सर्व तपासण्या आम्ही करणार आहोत त्यासाठी हे सर्व सॅम्पल दिल्ली भोपाल पुणे आणि चेन्नई येथे आम्ही घेऊन जाणार आहोत.


डॉ.सोमेश गुप्ता ( Senior Dermatologist , AIIMS Delhi) - 


आम्ही या परिसरात पोहोचलो आहोत त्यानंतर रुग्ण तपासणी केल्यानंतर आमचा असं लक्षात आलं की केस गळती झाल्यानंतर अनेक लोकांना नवीन केस येत आहेत मात्र ते सुद्धा गळत आहेत या लोकांच्या अनेक तपासण्या आम्ही करू आणि त्यानंतर निदान होईल मात्र इतकं नक्की आहे की माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण जगात अशा प्रकारच्या केसेस आम्ही कुठेही बघितल्या नाही.


डॉ.राजनारायण तिसरी ( संचालक , ICMR दिल्ली) - 


या परिसरात आम्ही पोहोचल्यानंतर अनेक रुग्ण तपासले त्यानंतर या रुग्णांच्या अनेक वस्तूंचे आम्ही नमुने घेतले आहेत जसे गहू साबुन डोक्याला लावायचं तेल शाम्पू वगैरे वगैरे या सर्व बाबींचा आम्ही तपासणी करणार आहोत या तपासण्या सर्व उच्चस्तरीय असतील साधारणता याला एक महिना लागू शकतो आणि त्यानंतरच आम्ही निष्कर्ष काढू शकतो की डोक्यावरील केस का गळत आहेत मात्र अशा प्रकारच्या केसेस आम्ही पहिल्यांदाच बघत आहोत.


डॉ.शिला गोडबोले ( ICMR, Virology , Pune) - 


आम्ही या परिसरात आज अनेक रुग्ण तपासले मात्र अशा प्रकारचे रुग्ण आम्ही पहिल्यांदाच बघत आहोत जगात कुठेही अशा प्रकारचे केसेस असल्याचा रिपोर्टेड नाही त्यामुळे या सर्व युनिक केसेस आहेत या सर्व केसेसची आम्ही बारकाईने अभ्यास करणार तपासण्या करणार आणि त्यानंतर आम्ही निष्कर्षावर पोहोचणार.


ही बातमी वाचा: