बुलढाणा : बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथे यंदाही 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव दिवस साजरा केला जाणार आहे. या महोत्सवासाठी उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे , अंबादास दानवे, नाना पटोले या नेत्यांनी येण्यास सहमती दाखवली असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं का..? असा सवाल करताच त्यांनी या प्रश्नावर उत्तर देण्याचं टाळलं.  तर एकीकडे मराठा क्रांती ठोक मोर्चाने पंढरपूरच्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी जिजाऊ जन्मोत्सवाला स्वतःहून यायला पाहिजे अशी मागणी केली आहे.


येत्या 12 जानेवारीला सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंच्या 425 व्या जन्मोत्सवचे आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. कोरोनानंतरच्या काळात होणारा हा पहिलाच निर्बंधमुक्त सोहळा असल्याने या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर हजेरी लावणार आहेत. 12 जानेवारीला जिजाऊ जनस्थान असलेल्या राजे लखुजी जाधव राजवाड्यात सकाळी पूजन झाल्यानंतर मराठा सेवा संघाचा कार्यक्रम जिजाऊ जनमोत्सव येथे दुपारी आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अनेकांना निमंत्रण दिलं असून यातील खासदार उदयनराजे भोसले , सुप्रिया सुळे , अंबादास दानवे , नाना पटोले इत्यादी नेत्यांनी येण्यास सहमती दाखवली असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना आपण निमंत्रण दिलं का..? असा सवाल करताच त्यांनी या प्रश्नावर उत्तर देण्याचा टाळलं.


मात्र खेडेकर म्हणाले की,  जे नेते संपर्कात होते त्या सर्वांना आम्ही निमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरे चिखली येथे सभेसाठी आले असता आम्ही त्यांना ही आमंत्रण दिले आहे. मात्र परवा कार्यक्रम असून ही त्यांचं अद्याप त्यांची वेळ आलेलं नाही.  एकीकडे मराठा क्रांती ठोक मोर्चाने सिंदखेडराजा येथे पत्रकार परिषद घेऊन पंढरपूरच्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी जिजाऊ जन्मोत्सवाला स्वतःहून यायला पाहिजे अशी मागणी केली आहे. मात्र या जन्मोत्सवाच्या आयोजकांनी  मुख्यमंत्र्यांना मात्र निमंत्रण दिलेलं नसल्याची माहितीही मिळाली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सिंदखेड राजा नगरपालिकेकडून निमंत्रण 


आपल्याला मुख्यमंत्री कार्यालयातून निमंत्रण मिळाल्याची माहिती मिळाली होती , ते निमंत्रण स्थानिक सिंदखेडराजा नगर परिषदेकडून दिल्या गेलं आहे. नगर परिषद सिंदखेडराजा यांनी माजी आ.शशिकांत खेडेकर यांच्या मार्फत जिजाऊ जन्मोत्सव शासकीय पूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावं यासाठी हे निमंत्रण दिल्या गेलं आहे , या निमंत्रणाचा  व मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमाचा किंवा पुरुषोत्तम खेडेकरांचा काहीही संबंध नसल्याची माहिती शशिकांत खेडेकर यांनी दिली आहे.