बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहे . फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्या बाउन्सरनी कर्जदाराचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याचं उघड झालं आहे. मारहाणच नव्हे तर तीन दिवस डांबून ठेऊन शरीरावर सिगारेटचे चटके सुद्धा देण्यात आले. या घटनेमुळे संताप व्यक्त होतो आहे. कर्जवसुलीसाठी कर्जदारांना वसुली अधिकाऱ्यांनी धमकी देऊ नये, त्यांना अवेळी कॉल करू नये असं रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) निर्देश देऊनसुद्धा त्याचं पालन करण्यात येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदाराचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शेगावात उघडकीस आली. कॅपिटल नावाच्या कंपनीकडून शेगाव येथील अशपाक खान मेहता या 32 वर्षीय युवकाने बोलेरो वाहनावर कर्ज घेतले होते. मात्र वाहनाचा व्यवसाय मंदीत आल्याने कर्जदाराने हे वाहन अकोला येथील एकाला विकले आणि कायदेशीररित्या त्याकडून नोटरी करून घेऊन कर्जाची रक्कम तो फेडेल असा करारनामा केला. मात्र सदर कर्जदाराने फायनान्स कंपनीकडे रक्कम भरली नसल्याने रविवारी खामगाव येथील चार जणांनी शेगावात येऊन कर्जदार अशपाक खान याचे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण केले
अपहरण केल्यानंतर स्थानिक शेगावातील विश्रामभवनात नेले व तेथे रात्री उशिरापर्यंत बेदमपणे मारहाण केली. यानंतर सदर कर्जदाराला मोटरसायकलवर बसवून खामगाव शहरातील शंकरनगर भागातील एका घरात नेऊन तिथे डांबून ठेवले यानंतर चौघांनी सदर कर्जदाराला बेदमपणे मारहाण करत संपूर्ण शरीरावर सिगारेटचे चटके दिले. हा अत्याचार त्यांचा दिवसभर चालला सतत तीन दिवस या कर्जदाराचे हातपाय बांधून अत्याचार करण्यात आला. एवढेच नाही तर कर्जदाराकडून दोन चेकवर स्वतःच्या हस्तक्षरात सात लाखांची रक्कम टाकून घेऊन व्हिडिओ बनवण्यात असल्याचे पीडित सांगतो. यानंतर गाडी परत आणून देतो या आश्वासनानंतर गंभीर जखमी असलेल्या अशपाक खानला खामगावच्या बस स्थानकावर शंभर रुपये देऊन सोडून देण्यात आले.
अशपाक खान याने शेगाव गाठल्यानंतर मंगळवारी रात्री सर्व घटना आपल्या नातेवाईकांना सांगितली यानंतर बुधवारी शहर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली यामध्ये आरोपी विजय काळे , मंगेश तायडे , प्रवीण बोदडे रआणि आणखी एक अनोळखी इसमांविरुद्ध अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :