Kalyan Crime News: छेड काढल्याची तक्रार दिल्याने पीडित मुलीच्या पित्यावर तीन वेळा जीवघेणा हल्ला केल्याची घटना सकाळी वाशिममधून समोर आली होती. इकडे कल्याणमध्ये मात्र आपल्या मुलीची छेड काढल्यानंतर पित्याचा रुद्रावतार पाहायला मिळाला.  कल्याणमध्ये एका बारा वर्षीय मुलीची एका तरुणाने छेड काढली. घटना माहित पडताच संतप्त मुलीच्या बापाने त्याच्या मित्रांसह छेड काढणाऱ्या तरुणाला गाठत त्याचे अपहरण केले आणि त्याला बेदम मारहाण केली. ही घटना कल्याण पश्चिमेत  घडली आहे.  


या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. तर छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात देखील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


कल्याणमध्ये राहणाऱ्या नूपूर चव्हाण नावाच्या तरुणाने एका बारा वर्षीय मुलीची छेड काढली. मुलीने घडला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. हे ऐकताच मुलीच्या वडिलांनी त्याच्या काही मित्रांना बोलावून घेतले. छेड काढणाऱ्या नूपूरचे कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकातून अपहरण केले. त्याला एपीएमसी मार्केटच्या आवारात घेऊन गेले. त्याठिकाणी नूपूरला बेदम मारहाण केली. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी छेड काढणाऱ्या नुपूर चव्हाणच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर नुपूरचं अपहरण करत बेदम मारहाण करणाऱ्या मुलीच्या वडिलांसह अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.


ही बातमी देखील वाचा-


Washim : छेड काढल्याची तक्रार दिल्याने पीडितेच्या पित्यावर तीन वेळा जीवघेणा हल्ला, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह