Buldhana: विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या अशा एकल महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांचा पुनर्विवाह व्हावा, या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळावा. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाण्यातील प्रा. दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून मानस फाउंडेशनच्या माध्यमातून एक चळवळ राबवली जात आहे. मानस फाउंडेशन माध्यमातून आजपर्यंत 90 पेक्षा अधिक विधवा महिलांचे पुनर्विवाह लावले गेले आहेत, तर शंभरपेक्षा अधिक एकल महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मानस फाउंडेशनने एकल महिलांच्या बाबतीत सुरू केलेली ही चळवळ आता लोक चळवळ होताना दिसत आहे, आणि हीच विधवा, घटस्फोटीत, परितक्ता महिलांच्या बाबतीत परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल. (Buldhana news)

थाटामाटात मिरवणूक,  संसारउपयोगी साहित्य

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मानस फाउंडेशनच्या वतीने एकल महिलांचा पुनर्विवाह सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये दहा जोडपी विवाहबद्ध झाली आहेत, पुनर्विवाह करणाऱ्या जोडप्यांची मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.. अगदी पहिल्या विवाहाप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले, विवाहबद्ध झालेल्या दहा जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य आणि पाच लाख रुपयांचे विमा कवच देखील देण्यात आले, यावेळी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

 

बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढा; राजू शेट्टी आक्रमक

शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट बघतात. कर्जमाफीतून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर उडवतात, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले होते. तसेच 'भिकारीही एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देत आहोत. तरीही त्याचा गैरवापर केला जातो, असे वादग्रस्त वक्तव्य देखील माणिकराव कोकाटे यांनी याआधी केले होती. माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. तर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटे यांनी तंबी दिली होती. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (raju shetti) यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

हेही वाचा:

Raju Shetti : बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढा; राजू शेट्टी आक्रमक, शेतकऱ्यांना का गंडवलं? अजितदादांनाही सवाल