Raju Shetti : शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट बघतात. कर्जमाफीतून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर उडवतात, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले होते. तसेच 'भिकारीही एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देत आहोत. तरीही त्याचा गैरवापर केला जातो, असे वादग्रस्त वक्तव्य देखील माणिकराव कोकाटे यांनी याआधी केले होती. माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. तर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटे यांनी तंबी दिली होती. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (raju shetti) यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी निशाणा साधलाय. 

राजू शेट्टींची माणिकराव कोकाटेंवर टीका

माणिकराव कोकाटे यांच्या सारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवू नये. अजित दादांनी समज दिल्यानंतरही त्यांचे बेताल वक्तव्य थांबलेले नाहीत. माणिकराव कोकाटे यांनी केंद्रात जाऊन जे आयात शुल्क आता शून्य टक्क्यावर आणलं ते जर दोन महिन्यापूर्वी आणला असतं तर संपूर्ण कांदा जगाच्या बाजारामध्ये विकला गेला असता. स्वतःलाही जमत नाही आणि केंद्रालाही जाब विचारण्याची हिंमत नाही, असा टोला त्यांनी यावेळी माणिकराव कोकाटे यांना लगावला आहे. तर शेतकऱ्यांना शहाणपणा शिकवण्यापेक्षा माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे, असा हल्लाबोलही राजू शेट्टी यांना केला आहे. 

शेतकऱ्यांना का गंडवलं? अजितदादांनाही सवाल

दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्तीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आक्रमक झाली असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे निवडणुकीत आश्वासन देणाऱ्या महायुतीमधील मंत्री आणि नेत्यांना जाहीर कार्यक्रमात जाऊन जाब विचारणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. अकरा वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असताना खोटं आश्वासन का दिलं? शेतकऱ्यांना का गंडवलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना शक्तीपीठासारखे 86 हजार कोटीचे प्रकल्प का राबवले जातात? असा सवाल उपस्थित करत राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. 

आणखी वाचा 

नांदेड हादरलं! कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, शेतात बाभळीच्या झाडाला...