बुलढाणा: जिल्ह्यातील एका 32 वर्षीय महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली होती. दरम्यान, या महिलेची बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात प्रसूती (Buldhana Pregnant Women) झाल्यानंतर या बाळाला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज (4 जानेवारी) या बाळावर अमरावतीच्या 5 डॉक्टर आणि 12 जणांच्या चमूने यशस्वी शास्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, या बाळाच्या पोटातून दोन अविकसित बाळांचे अवशेष यावेळी बाहेर काढण्यात आले.
अशा प्रकारची ही जगभरातील केवळ 34वी घटना असू शकते, अशी शक्यता डॉ. उषा गजभिये यांनी यावेळी व्यक्त केली आहे. या यशस्वी शास्त्रक्रियेबद्दल बाळाचे वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले आहे. तर वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ अशा घटनेतील महिलेची प्रसूती सुरक्षित झाल्याने डॉक्टरांच्या पथकाने ही समाधान व्यक्त केलं आहे. या दुर्मिळ परिस्थितीला वैद्यकीय भाषेत " फिटस इन फेटू " अस म्हटल्या जात. साधारणतः पाच लाख सामान्य गर्भवती महिलांत अशा प्रकारची एखादी घटना बघायला मिळते.असेही डॉक्टर म्हणाले.
फिटस इन फेटू म्हणजे काय?
बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना समोर आली होती. जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात आतापर्यंत 200 तर देशात मोजक्याच अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे ही नेमकी घटना काय आहे पाहूयात.
बुलढाणा जिल्हा महिला रुग्णालयात एक 32 वर्षीय गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली. ही महिला 32 आठवड्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तपासून तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात ही महिला सोनोग्राफीसाठी गेल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर त्यांना धक्काच बसला. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजलं की, महिलेच्या पोटात बाळ आहे आणि त्या बाळाच्या पोटातही एक दुसरे बाळ आहे. डॉक्टरांना विश्वासच बसेना म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलवून पुनर तपासणी करून निश्चित केलं.
दरम्यान, महिलेची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आल्याने या परिस्थितीला "फिटस इन फिटो " असं वैद्यकीय भाषेत म्हटले जाते हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त 200 तर आपल्या देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे.
नेमकं ही दुर्मिळ घटना काय?
-गर्भवती महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटातही एक बाळासारखाच गोळा दिसतो याला "फिटस इन फेटो" असं म्हटल्या जातं.
-"काँनजेनाईटल एबनॉर्मलिटी" मुळे ही अशी परिस्थिती उद्भवते.
-जवळपास ५ लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये एक , तर २० लाख गरोदर महीलांमध्ये एखाद्या महिलेत अशी परिस्थिती दिसून येते.
-अशा वेळेस प्रसूतीनंतर ज्यावेळी बाळाला बाळाच्या पोटातील बाळाचा त्रास होतो त्यावेळी शस्त्रक्रिया करून त्या बाळाच्या पोटातील बाळ काढून घेतल्या जात.
- बुलढाणा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना समोर आली आहे.
हे ही वाचा