Sonu Nigam Injured in Live Show : प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगम याची लाइव कॉन्सर्टमध्ये तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान, सर्व काही ठीक सुरु असताना अचानक सोनूची तब्येत बिघडली. लाईफ शोदरम्यान सोनूला पाठीच्या दुखण्याचा त्रास होऊ लागला. या दुखण्याशी लढताना त्याने कशाप्रकारे हा लाईव्ह शो पूर्ण केला याचा एक व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 'कल हो ना हो' हे गाणं गाताना लाईव्ह परफॉर्मन्सवेळी त्याला अचानक पाठीचा त्रास झाला. असं असतानाही, त्याने वेदनेवर मात केली आणि नेहमीप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी केली. पुण्यामध्ये सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टवेळी हे घडलं.
सोनू निगमची लाइव कॉन्सर्टमध्ये तब्येत बिघडली
सोनू निगमने इंस्टाग्रामवर याचा एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने त्याच्या इन्स्टाफॅमला त्याच्या अनुभवांबद्दल सांगितले. तो म्हणाला होता, "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस, पण खूप समाधानकारक. मी गात होतो आणि हालचाल करत होतो, म्हणून मला पेटके येऊ लागले, पण मी ते कसं तरी हाताळलं. लोकांच्या अपेक्षेपेक्षा मला कमी करायचं नव्हतं. प्रेक्षकांच्या अपेक्षांचा हिरमोड करायचा नव्हता. मला आनंद आहे की, अखेर सर्व काही व्यवस्थित पार पडलं."
वेदनेने कण्हतानाचा व्हिडीओ व्हायरल
सोनू निगमने पुढे सांगितलं की, "पण हा अनुभव अत्यंत वेदनादायक होता, माझ्या मणक्यात सुई घुसवल्यासारखे वाटत होते, तशा वेदना होत होत्या आणि मी थोडीशीही हाचचाल केली तर ती सुई मणक्यात घुसेल, असं वाटत होतं."
सोनू निगमने शेअर केला व्हिडीओ
सोनू निगमने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताना त्यावर कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "सरस्वती मातेने काल रात्री माझा हात धरला होता", आणि यासोबत त्याने हात जोडल्याचा इमोजी पोस्ट केला आहे.
सोनूची ही पोस्ट पाहताच त्याचे चाहते चिंतेत आहे. नेटकऱ्यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये शुभेच्छा संदेश लिहिले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :