Lucky Zodiac Signs: हिंदू दिनदर्शिकेनुसार, आजची तारीख 26 ऑगस्ट, आज हरतालिका तृतीया आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अत्यंत खास आहे. आज ग्रहांच्या हालचालीची स्थिती पाहता तब्बल 4 शुभ योग बनतायत. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत खास आहे. या शुभ योगांमुळे 12 पैकी 4 राशींचे भाग्य उजळणार आहे. या लोकांवर देवी लक्ष्मीची मोठी कृपा होणार आहे. या लोकांचे कोट्याधीश होण्याचे संकेत मिळत आहे.

हरतालिका तृतीयाच्या दिवशी 4 शुभ योग बनतायत..!

 ज्योतिषशास्त्रानुसार, आज हरतालिका तृतीयाच्या दिवशी सर्वात प्रभावशाली मानले जाणारे पंचमहापुरुष योग, रवी योग, साध्य योग आणि शुभ योग, असे 4 शुभ योग तयार होत आहेत. हे योग 4 राशींना धन, प्रेम, आदर देतील.

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, हरतालिका तृतीयाच्या दिवशी तयार होणाऱ्या शुभ योगांमुळे मेष राशीच्या लोकांना भाग्य मिळेल. जुनी प्रलंबित कामे आता पूर्ण होतील. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. विवाहित लोकांसाठी लग्नाची शक्यता असेल. विवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेम वाढेल.

सिंह

ज्योतिषशास्त्रानुसार, हरतालिका तृतीयाच्या दिवशी निर्माण होणारा राजयोग सिंह राशीच्या लोकांना प्रचंड संपत्ती देईल. जीवनात आनंद वाढेल. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. नवीन घर, गाडी खरेदी करण्यासाठी वेळ चांगला आहे. घरात आनंदाचे वातावरण असेल.

कन्या

ज्योतिषशास्त्रानुसार, हरतालिका तृतीयाच्या दिवशी निर्माण होणाऱ्या प्रभावशाली योगांमुळे कन्या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढेल. पैशाअभावी पूर्ण होत नसलेले काम आता पूर्ण होईल. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. वरिष्ठांशी संबंध दृढ होतील.

मीन

ज्योतिषशास्त्रानुसार, हरतालिका तृतीयाच्या दिवशी निर्माण होणाऱ्या 4 शुभ योगांमुळे मीन राशीच्या लोकांना फायदा होईल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला कामात यश मिळेल. लग्न होऊ शकते. नवविवाहित जोडप्यांना मुलाची चांगली बातमी मिळू शकते.

हेही वाचा :           

Horoscope Today 26 August 2025: आज हरतालिकेचा दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथ असतील पाठीशी भक्कम, आजचे राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)