Maharashtra Politics भंडारा: भाजपने आमचे कार्यकर्ते पळविले, परिणय फुकेंनी माझ्यासाठी निवडणुकीत सभा घेतल्या नाहीत, असा थेट आरोप काही महिन्यापूर्वी भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांनी (Narendra Bhondekar) परीणय फुके आणि भाजपवर लावला होता. त्यानंतर भाजप आमदार परीणय फुकेंनी एका कार्यक्रमात एक उदाहरण देताना, "शिवसेनेचा बाप मीचं" असं वक्तव्य केलं होतं. यावरून भंडाऱ्यातचं नव्हे तर, राज्यभरात त्याचे पडसाद उमटलेत. यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खास विश्वासू परिणय फुकेंनी (Parinay Fuke) त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला, असं म्हणतं दिलगिरी व्यक्त करावी लागली होती.
आधी एकमेकांवर सडकून टीका, आता विकासाची एकत्र मारली कुदळ
भाजप आमदार परीणय फुके आणि शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर या दोघांच्याही परस्परविरोधी वक्तव्यानं भंडाऱ्यात भाजप आणि शिवसेनेत दरी वाढल्याचं चित्र बघायला मिळालं. दोन्ही पक्षात तणाव वाढल्याचं चित्र असतानाचं भंडाऱ्यात स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत जिल्हा क्रीडा संकुलावर एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान भोंडेकर आणि फुके हे एकत्र आलेत. एकत्रचं नव्हे तर, दोघांनीही एकमेकांकडे बघून स्माईल देत, पहिले तुम्ही....पहिले तुम्ही...असं म्हणतं एकचं कुदळ दोघांनीही हातात पकडून एकाचवेळी भूमिपूजनाची कुदळ मारलं. भंडाऱ्याच्या विकासासाठी ज्या पद्धतीनं फुके आणि भोंडेकरांनी कुदळ मारली, त्यातून दोघांची दिलजमाई झाल्याचं बघायला मिळालं. भविष्यातही दोघांनी विकासासाठी एकत्र यावं. अन्यथा एकमेकांवर टीका केल्यास कोण कधी कुणाच्या पायावर कुदळ मारून घेईल, हे सांगता येणार नाही, अशी चर्चा आता भंडाराकरांमध्ये रंगली आहे.
दूध संघाच्या मेळाव्याला शिंदे सेनेच्या आमदाराची गैरहजेरी; आमदार फुके उपस्थित
'शिवसेनेचा बाप मीचं' असं वादग्रस्त विधान केल्यानं भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर चौफेर टीका झाली होती. राज्यभरात याचे पडसाद उमटल्यानंतर पहिल्यांदाच आमदार फुके हे भंडाऱ्यात आले होते. महायुतीच्या ताब्यात असलेल्या भंडारा जिल्हा दूध संघाच्या मेळाव्याला भाजप आमदार फुके आणि शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे दोघेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला भाजप आमदार परीणय फुके आवर्जून उपस्थित होते. मात्र, शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची अनुपस्थिती सर्वांना खटकली.
वादग्रस्त विधानानंतर फुके आणि भोंडेकर दोघेही या कार्यक्रमाला एकाचं मंचावर येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतं होती. मात्र, भोंडेकर यांनी कार्यक्रमाला पाठ दाखविल्यानं अजूनही त्यांच्या मनातून फुकेंच्या बाबतीतली मळमळ निघाली नाही, हेचं यावरून लक्षात आल्याचे बोललं जात होतं. मात्र भंडाऱ्यात स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत जिल्हा क्रीडा संकुलावर एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान भोंडेकर आणि फुके हे एकत्र आलेत. त्यामुळे भाजपच्या परीणय फुके आणि शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांची दिलजमाई झाल्याचे बोललं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या