पटना: जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज बिहारचे 37 वे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेत आहेत. नितीश यांच्याबरोबर एनडीएचे काही मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात सामील होणार आहेत. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात कोण कोणते मंत्री असतील असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मंत्रिमंडळात कोणते मंत्री असतील यांची लिस्ट एबीपी न्यूजने जारी केली आहे.

मंत्रिमंडळात जेडीयूचे नेते

विजय चौधरी विजेंद्र यादव अशोक चौधरी मेवालाल चौधरी शीला मंडल

नितीश मंत्रिमंडळात सामील होणारे भाजप नेते

तारकिशोर प्रसाद- उपमुख्यमंत्री रेणू देवी- उपमुख्यमंत्री मंगल पांडे रामप्रीत पासवान नंद किशोर यादव- सभापती जीवेश कुमार मिश्रा

इरत नेते

संतोष मांझी मुकेश सहनी

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात यावेळी उपमुख्यमंत्रीपदावरून सुशील कुमार मोदी यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी हे बिहारचे उपमुख्यमंत्री असतील. त्याचबरोबर बिहार विधानसभेचे सभापतीही भाजपचे असतील. नंद किशोर यादव हे सभापती होतील हे निश्चित आहे.

तारकिशोर प्रसाद यांची रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि बेतियाहचे आमदार रेणू देवी यांची उपनेतेपदी निवड झाली. तारकिशोर प्रसाद वैश्य समाजातील आहेत आणि चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आरएसएसशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रसाद यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. रेणू देवी मागासवर्गीयांच्या नोनिया समाजातून येतात आणि चार वेळा बेतिया सीटवरुन निवडून आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार; NDA च्या बैठकीत काय झालं?