भिवंडी : पतीसोबत दुचाकीवरून जात असताना 22 वर्षीय नवविवाहितेची अचानक धावत्या दुचाकीच्या चाकामध्ये ओढणी अडकल्याने ती रस्त्यावर पडली. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने तिला चिरडल्याची दुर्दैवी घटना भिवंडीत घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे ही महिला 8 महिन्यांची गरोदर होती.
किर्ती देवेंद्र जाधव ( रा.चिंचवली) असं मृतक नवविवाहितेचे नाव आहे. भिवंडीत गुरुवारी सायंकाळी 5 वाजता येवई - पिसे रोडवरील भावाळे गावानजीकच्या ऑलसेंट इंग्लिश स्कुलसमोर ही घटना घडली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत किर्ती ही पती देवेंद्र याच्यासोबत चिंचवली येथून भावाच्या मुलाला कल्याण येथील एका रुग्णालयात पाहण्यासाठी जात होते. त्यावेळी पिसे रोडवरील भावाळे गावानजीक असलेल्या ऑलसेंट इंग्लिश स्कुलसमोर धावत्या दुचाकीच्या चाकात तिची ओढणी अडकून पडली होती.
ओढणी चाकात अडकल्याने ती दुचाकीवरून रस्त्यावर पडली असता त्याच सुमाराला पाठीमागून येणाऱ्या टेम्पो तिच्या अंगावरून जाऊन ती गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत भिवंडीतील सिराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. किर्ती यांचं साधारण वर्षापूर्वीचं लग्न झालं होतं. तसंच ही महिला 8 महिन्याची गरोदर होती. किर्ती यांच्या मृत्यूमुळे जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पडघा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेवून पंचनामा करून किर्तीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
धावत्या दुचाकीत ओढणी अडकून पडल्याने गर्भवतीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Dec 2019 09:08 PM (IST)
ओढणी चाकात अडकल्याने ती दुचाकीवरून रस्त्यावर पडली असता त्याच सुमाराला पाठीमागून येणाऱ्या टेम्पो तिच्या अंगावरून जाऊन ती गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत भिवंडीतील सिराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -