Yavatmal Washim Lok Sabha Election Results 2024 : यवतमाळ वाशिम मतदारसंघाची (Yavatmal Washim Lok Sabha) खासदर म्हणून मी गेल्या 25 वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधित्व करीत आहे. या भागातील जनतेने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखविला आहे. प्रत्येक निवडणुकीत माझे मताधिक्य वाढत गेले आहे. त्यामुळे यावेळी जर सहाव्यांदा मला उमेदवारी मिळाली असती तर, एक लाखाने नव्हे तर दोन लाखाने मी निवडून आले असते. असा विश्वास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नेत्या आणि  माजी खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी बोलून दाखवला आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा  मतदारसंघात  महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील (Rajshri Patil) यांच्या पराभवावर भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी विश्लेषण करत खंतही  व्यक्त केली आहे.


सर्व्हेचे कारण सांगून माझी उमेदवारी नाकारली - भावना गवळी


लोकसभा मतदारसंघांमध्ये सहाही विधानसभेवर महायुतीचे आमदार होते. मी प्रत्येक वेळी पुसद, दिग्रस, यवतमाळ, राळेगाव, वाशिम आणि कारंजा या मतदारसंघामधून मताधिक्य घेतले होते. यावेळी तसे झाले नाही. तरीसुद्धा पराभव झाला. त्यामळे आता आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. खासदारकीची उमेदवारी नाकारल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो मला शब्द दिला, तो दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे योग्य ते पुनर्वसन करतील याची मला खात्री असल्याचेही भावना गवळी (Bhavana Gawali) म्हणाल्या.


माझ्या उमेदवारी वेळी सर्व्हेचे कारण सांगून उमेदवारी नाकारण्यात आली. ज्यांनी विजयाची जबाबदारी घेतली त्यांच्याच मतदारसंघात विरोधी उमेदवाराने अधिक मताधिक्य घेतले. त्यामुळे विधानसभेत आता सर्व्हे करूनच उमेदवारी द्यावी, असे सूचक व्यक्तव्यही पालकमंत्री संजय राठोड आणि भाजप आमदार मदन येरावार यांच्या संदर्भात भावना गवळी यांनी केले. 


सत्य हे कटू असतं, पण ते बोललं पाहिजे


कधीकधी सत्य हे कटू असतं, पण ते बोललं पाहिजे. जनतेच्या काही इच्छा पक्षश्रेष्ठींकडून पूर्ण झाल्या नाहीत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या पराभवावर  शिवसेना नेत्या आणि माजी खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी विश्लेषण करत  खंत व्यक्त केली. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या. खापर फोडून, एकमेकाला दोष देऊन काही निष्पन्न होणार नाही. आता परत एकदा  एकत्र हातामध्ये हात घालून महायुतीला काम करावं लागणार आहे. यवतमाळमध्ये  जनतेने जो कौल  दिलेला आहे. तो मान्य करावा लागेल, असेही त्या म्हणाल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या