Bhandara Rain : सध्या राज्यात पावासाचा (Rain) जोर काहीसा कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र पाऊस कोसळताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळं राज्यातील अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. भंडाऱ्यात (Bhandara) देखील सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आज हवामान विभागानं भंडाऱ्याला यलो अलर्ट दिला आहे. आधीच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे मठं नुकसान झालं होते. आता सकाळपासून पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आस्मानी संकट येण्याची शक्यता आहे.


भंडाऱ्यात आज सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडून भंडारा जिल्ह्याला आज येलो अलर्ट मिळाला आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी हाहाकाराच्या जखमा ताज्या असल्याने आता होत असलेला पाऊस धडकी वाढवणारा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट घोंगावत असल्याची चर्चा सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाने नदी नाले तुंडूंब भरुन ओसांडून वाहू  लागले आहेत. त्यामुळं जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. 




 गोंदियात देखील मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी 


एकीकडे भंडाऱ्यात जोरदार पाऊस कोसळत असताना दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात देखील मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे गोंदियाला हवामान खात्याच्या येलो अलर्ट मिळाल्याने जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसानं पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच 4 दिवसांपूर्वी गोंदियात झालेल्या अतिवृष्टीमुळं नदी नाले ओसांडून वाहत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अधिक नदी नाले तुंडूंब भरुन वाहू लागले आहेत.  


आज आणि उद्या कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता 


राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे. तर काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतलीआहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, आज काहीसा पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आज आणि उद्या कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: