Bhandara Rain : भंडारा (Bhandara) जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. काल दिवसभरापासून जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या तीन चार दिवसापासून भंडारा जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. गेल्या काही दिवसात जिह्यात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. आता पुन्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.  


वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता


मागील तीन ते चार दिवसापासून भंडारा जिल्ह्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर कालपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसात जिह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. परिणामी गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 गेट उघडण्यात आली होती. पाऊस कमी झाल्यानं कालपर्यंत 31 गेट बंद करुन केवळ दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, काल सुरू झालेला हा पाऊस पाच तासाच्या विश्रांतीनंतर रात्री पुन्हा सुरू झाला. यामुळं नदी नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागलेले आहेत.


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भात यलो अलर्ट


दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळं शेती कामांना वेग आला आहे. दरम्यान, काही भागात या पावसाचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटकाही बसला आहे. तर काही ठिकाणी जमिनी खरवडून देखील गेल्या आहेत. तर काही भागात अद्यापही पावसाची गरज आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट