Bhandara Crime News : प्रेम हे आंधळ असतं, प्रेमात आणि युद्धात सगळे माफ असतं, असे बरंच काही आपण प्रेमाबद्दल ऐकत अथवा वाचत असतो. मात्र यांच प्रेम प्रकरणात एका  प्रेयसीनंचं तिच्या जुन्या प्रियकराला हाताशी धरून प्रेमात अडसर ठरणाऱ्या दुसऱ्या नवीन प्रियकराला यमसदनी पाठविलं. ( Bhandara Lover Murder) हा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात  (Bhandara) घडला. पूनम नामक प्रेयसीचे पाहिलं प्रेम मंथन ठाकरेवर होते. त्यानंतर त्यांच्यात काही कारणावरून दुरावा निर्माण झाला आणि त्यानंतर ते एकमेकांपासून दूर झाले. अल्पावधीत पूनमच्या आयुष्यात नयन हा नवीन प्रियकर आला.  या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू असल्याची कुणकुण मंथनला लागली आणि पुन्हा एकदा तो आपलं पहिलं प्रेम मिळविण्यासाठी प्रयत्न करू लागला. पूनमनेही मंथनचं प्रेम स्वीकारून दोघेही पुन्हा एकत्र आले. मात्र नयन या दोघांसाठी अडसर ठरत होता. त्यातूनच नयनचा काटा काढण्याच्या उद्देशाने पूनम, मंथन आणि एक मित्रांच्या मदतीने 19 वर्षीय नयनचा बेदरकारपणे खून केला. या प्रकरणी आता पोलिसांनी तरुणीसह दोघांना अटक केली आहे. 


त्रिकोणी प्रेम प्रकरणातून घडली थरारक घटना



काही दिवसांपूर्वी वैनगंगा नदीच्या कोरंभी ते सालेबर्डी परिसरातील बॅक वॉटरमध्ये मासोळी पकडायच्या जाळीत एका तरुणाचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत  मृतदेह आढळला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी तपास केले असता हा मृतदेह 19 वर्षीय नयन मुकेश खोडपे या तरुणाचा असल्याची ओळख पोलिसांना पाटली. त्यानंतर या तपासतील धागेदोरे पुढे गेल्यानंतर काही संशयित व्यक्तीची पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यातून धक्कादायक बाब उघडकीस आली. मंथन ठाकरे या तरुणाचे पूनम नामक एका तरुणी बरोबर प्रेमसंबंध होते. त्यानंतर या दोघांमध्ये काही कारणावरून वाद होऊन दुरावा निर्माण झाला.  त्यानंतर अल्पावधीतंच पूनामच्या आयुष्यात नयन नामक एक तरुण आला. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघेही अधिक जवळ आले. मात्र लवकरच पूनमच्या या नव्या प्रेम-प्रकरणाची कुणकुण मंथनला लागली. त्यानंतर मंथन पुन्हा एकदा आपलं पहिलं प्रेम मिळविण्यासाठी प्रयत्न करू लागला. या प्रयत्नात असलेल्या मंथनला पूनमनेही स्वीकारून दोघेही परत प्रेमात एकत्र आले.  मात्र नयन हा या दोघांच्या त्रिकोणी प्रेमात अडसर ठरत होता.


 प्रेयसीसमोर गळा आवळून घेतला जीव 


नयनचा काटा काढण्याच्या उद्देशाने मंथन आणि पूनमने एकत्र येत कटकारस्थान रचण्यास सुरूवात केली. ठरल्याप्रमाणे पूनमने 27 नोव्हेंबरला सकाळी नयनला फोन करून भंडारा येथे बोलावून घेतलं. तिथून पूनम आणि नयन एकाच मोटार सायकल क्रमांक एमएच 40 एए 4124 वरून जवाहरनगर परिसरातील नांदोरा झिरी इथं आलेत. दोघांनीही बराच वेळ एका झाडाखाली घालवला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मंथन आणि साहिल शरद धांडे हे दोघे मित्र दुचाकीनं तिथं आलेत. त्यांनी नयनसोबत भांडण करून नयनला मारहाण केली. नंतर पूनमच्या समोरच दोघांनी त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली.  नंतर हिरव्या कापडाने जीव जाईपर्यंत त्याचा गळा आवळून धरला. नयनचा मृत्यू झाल्याची खात्री करून पूनमसह दोघेही आरोपी दुचाकीनं सालेबर्डीमार्गे भंडाराकडे पळाले. त्यानंतर रात्री नशा करून पुन्हा मंथन आणि साहिल दोघेही दुचाकीनं सालेबर्डीमार्गे घटनास्थळी आलेत. नयन जिवंत नाही हे पटल्या नंतर कपड्याने त्याचे हातपाय बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सालेबर्डी जवळील पंडित नाल्यातील लहान पुलाजवळ गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मृतदेह हातपाय बांधून फेकून दिला. त्यानंतर घटनास्थळी येऊन त्यांनी मृत नयनची दुचाकी भंडारा तहसील कार्यालयाजवळ पडक्या इमारतीजवळ फेकून दिली. 


या थरारक प्रकरणात मृतकाचा भाऊ व नातेवाईकांनी सुरुवातीपासूनच मंथनवर संशय व्यक्त केला होता. त्या दिशेनी पोलिसांनी तपास करून आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर तपासात मंथन अशोक ठाकरे आणि साहिल शरद धांडे याने आपण हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोन आरोपीसह पूनम नरेंद्र कारेमोरे हिला देखील पोलिसांनी अटक केली. भंडारा न्यायालयाने तिन्ही आरोपींना हजर केलं असता त्यांना पुढील पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मीता राव, गुन्हे अन्वेषण शाखेचे नितिन चिंचोळकर मार्गदर्शनात जवाहरनगरचे सुधीर बोरकुटे हे करीत आहेत.